९१ वे अ.भा.मराठी साहित्य संमेलन बुलढाणा येथे

    दिनांक  11-Sep-2017बुलढाणा : ९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी बुलढाणांतील हिवरा आश्रमाची निवड करण्यात आली आहे. अ.भा.मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी याविषयी अधिकृत माहिती दिली आहे.


महामंडळाच्या संमेलन स्थळ निवड समितीची बैठक काल नागपुरातील विदर्भ साहित्य संघात पार पडली. यावेळी समितीने संमेलनस्थळासाठी तयार करण्यात आलेला अहवाल बैठकीत सदर केला. यामध्ये मराठी प्रतिष्ठान दिल्ली, मराठी वाङमय परिषद, बडोदा आणि बुलढाण्यातील स्वामी विवेकानंद आश्रम या तीन स्थळांवर चर्चा करण्यात आली.


बडोदा आणि हिवरा आश्रम या दोन स्थळांसाठी यावेळी मतदान देखील घेण्यात आले. यामध्ये हिवरा आश्रमाला समितीची सदस्यांनी पसंती दिली. हिवरा आश्रमाला मोठी परंपरा लाभेलेली आहे. हिवरा आश्रमाचा परिसर हा प्रशस्त आहे. यासाठी दोन हजार साहित्यिकांसह हजारो रसिकांच्या निवास आणि भोजनाची व्यवस्था येथे होऊ शकते तसेच दोन हजार स्वयंसेवकांची शिस्तबद्ध फळीदेखील या आश्रमात असून संमेलनाच्या वेळी यांची सहाय्यता होईल, हा सर्व गोष्टींचा विचार करूनच हिवरा आश्रमाला संमेलनाचा मान देण्यात आला आहे, असे माहिती जोशी यांनी यावेळी दिली.