अवयव दानासाठी जिल्ह्यात जनजागृती रॅली

    दिनांक  30-Aug-2017बुलढाणा : राज्य शासनाने आयोजित केलेल्या 'महाअवयवदान अभियानच्या पार्श्वभूमीवर काल जिल्ह्यात अवयवदानाविषयी लोकजागृती व्हावी या उद्देशाने 'अवयवदान जनजागृती रॅली आयोजन करण्यात आले होते. ही रॅली दोन दिवस चालणार असून काल जिल्हा सामान्य रूग्णालय येथे हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरीता पाटील, अति जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भुसारी, हृदयरोग तज्ज्ञ डॉ. लद्धड, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शोन चिंचोले, आयएमएचे अध्यक्ष डॉ. एल के राठोड, डॉ. कुटंबे आदी उपस्थित होते.


मृत्यूनंतर नागरिकांनी आपले अवयव दान करून अवयव निकामी झालेल्या नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी सहाय्य करावे. तसेच अवयवदान हे फक्त डोळ्यांपुरतेच मर्यादित न राहता, शरीरातील इतरही अवयव दान करण्याचा नागरिकांनी संकल्प करावा, या उद्देशाने राज्य सरकारकडून राज्यभरात महाअवयवदान हे अभियान राबवले जात आहे. याच पार्श्वभूमीवर काल जिल्ह्यात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये सहभागी झालेल्या डॉक्टरांनी नागरिकांना अवयवदानाचे महत्त्व समजावून सांगिलते. आपल्या अवयव दानामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात आपण आंदन भरू शकतो, त्यांना एक चांगले जीवन देऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी आपले अवयव दान करावेत, असे त्यांनी म्हटले. तसेच नागरिकांनी ' मरावे परी, कीर्ती रुपी उरावे' या समर्थांच्या उक्तीप्रमाणे वागले पाहिजे, असे आवाहन देखील यावेळी जनतेला करण्यात आले.