जिल्हास्तरिय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या कालावधीत बदल

    दिनांक  23-Aug-2017बुलडाणा : जिल्हा क्रीडा परिषदेकडून आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धेच्या कार्यक्रमात काही कारणांवरून बदल करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्पर्धेचा कालावधी बदलून तो २५ व २६ सप्टेंबर करण्यात आला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.


क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडा परिषद, बुलडाणा व्दारा आयोजित जिल्हास्तर शालेय बॉक्सिंग क्रीडा स्पर्धांचे आयोजन २३ ते २४ ऑगस्ट या कालावधीत जिल्हा क्रीडा संकुल, बुलडाणा येथे करण्यात आले होते. परंतु काही अपरिहार्य कारणास्तव ही स्पर्धा २५ सप्टेंबर व २६ सप्टेंबर या दिवशी घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. तसेच कार्यक्रमाचे स्थळ मात्र तेच राहील असे देखील प्रशासनाने सांगितले आहे.


२५ तारखेच्या पहिल्या दिवशी सर्वगट मुले व दुसऱ्या दिवशी सर्वगट मुली असे स्पर्धेचे स्वरूप असणार आहे. तरी याबाबत सर्व शाळा-महाविद्यालय, शारीरिक शिक्षक, खेळाडू, पालक यांनी या विषयी नोंद घेऊन स्पर्धेच्या दिवशी आपल्या खेळाडूंना उपस्थित ठेवावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांनी केले आहे.