ग्राहकांना कायद्याप्रमाणे संरक्षण मिळेल - ए.पी भंगाळे

    दिनांक  21-Aug-2017


बुलडाणा : ग्राहकांना योग्य सुविधा मिळावी तसेच त्यांच्या हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी अनेक कायदे तयार करण्यात आले आहे. या कायद्यांप्रमाणे ग्राहकांच्या हिताचे सर्वोत्तपरी संरक्षण केले जाईल. ग्राहकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. यासाठी ग्राहकांना कायद्याप्रमाणे संरक्षण मिळेल असे आश्वासन राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष ए.पी भंगाळे यांनी व्यक्त केला. जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या इमारतीच्या नुतनीकरणाप्रसंगी इमारतीच्या परिसरात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.


यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड विजय सावळे, जिल्हा मंचचे अध्यक्ष विश्वास ढवळे, सदस्य मनिष वानखडे आदी मान्यवर देखील उपस्थित होते.


ग्राहकांना योग्य सुविधा मिळाव्यात तसेच त्यांच्या हक्कांचे रक्षण करणे, हे ग्राहक संरक्षण मंचाचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यासाठी सामन्य नागरिकांना त्यांच्या ग्राहक हक्कांची माहिती असणे अत्यंत गरजे आहे. ग्राहकांना त्यांच्या हक्कांची माहिती झाल्यानंतर त्यांना आपल्या बरोबर होत असलेली फसवणूक लक्षात येईल व त्यावर काय कारवाई करणे गरजेचे आहे. याची देखील त्यांना ज्ञान येईल, असे देखील भंगाळे म्हणाले. तसेच ग्राहक संरक्षण कायद्याविषयी देखील त्यांनी उपस्थितांना थोडक्यात माहिती दिली.


ग्राहक हिताचा विचार करून अनेक नवीन कायदे तयार करण्यात आलेले आहेत. ग्राहकांना विहित सेवा देण्यासाठी सेवा हमी कायदा तयार करण्यात आला आहे. असे म्हणत सेवा म्हणजे उत्पादन व नागरिक म्हणजे ग्राहक. त्यामुळे नागरिकांना सेवा विहीत कालावधीत मिळण्याची हमी मिळाली आहे, असे मत जिल्हाधिकारी पुलकुंडकर यांनी व्यक्त केले.