ओवी लाईव्ह - गिरीधारी

    दिनांक  15-Aug-2017   


गिरिधारी  

श्रावणतील कृष्णाष्टमीला अवतरले भूवरी,
गोवर्धन गिरिधारी, अन् गीताधन गिरिधारी || १ ||

कैदेतील मायबापा पोटी कान्होबाचा जन्म, 
उपेक्षित मायबापा पोटी ज्ञानोबाचा जन्म || २ ||

सांदिपनी आश्रमी श्रीकृष्ण होई, ज्ञानेश्वर संपूर्ण,
निवृत्ती चरणी ज्ञानेश्वर होई, श्रीकृष्ण परिपूर्ण || ३  ||

कृष्णाने हाती लगाम घेतले, ज्ञानेशाने लेखणी, 
जन उद्धराया, बोध करिती मधुर गीतांमधुनी || ४ ||

उपनिषदांचे गुह्य, कृष्ण अलगद उलगडोनी सांगे, 
ज्ञानदेव ते प्रकट करोनी, डोळियांसी दावे || ५  ||

हा योगेश्वर तो योगीराज, गुरुपदी वाहती कर्मफललेणी
एक भक्तांचा ईश्वर, तर दुजा भक्तशिरोमणी || ६ ||

युगा युगांचा बाळ एक, एक होई माउली,  
एक असे ज्ञानेश्वर, दुजा ज्ञानछत्र घाली || ७ ||

गोपाळांचा मेळा नाचे चंद्रभागा अन् यमुनेतीरी,
प्रेमे गर्जे ‘माउली माउली’ अन् ‘राम कृष्ण हरि’ || ८ ||

 

- दिपाली पाटवदकर