काश्मीर खोर्‍यामध्ये अपप्रचारविरोधी युद्ध जिंकणे जरुरी !

    दिनांक  13-Aug-2017   

 
 
 
जम्मू आणि काश्मीरमधील नियंत्रणरेषेवरील घुसखोरीविरोधी अभियान, दहशतवादीविरोधी अभियान, हिंसाचाराचा सामना आणि सामान्य जीवन पुनर्स्थापित करणे, याबाबत भारतीय सैन्याने चांगली कामगिरी केली आहे. मात्र, जाणीवपूर्वक पसरवलेल्या अङ्गवा, अपप्रचार, दगडङ्गेक, निदर्शने करणारे वगैरेशी सामना करण्यात आपण कमी पडतो आहोत.
 
पाच दहशतवाद्यांना कंठस्नान : 

काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करणार्‍या पाच दहशतवाद्यांना सुरक्षा दलांनी सोमवारी कंठस्नान घातले. कुपवाडा जिल्ह्यातील माछिल विभागात ही घटना घडली. हे पाचही दहशतवादी पाकव्याप्त काश्मीरमधून काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात होते. प्रत्यक्ष ताबारेषेवर संशयास्पद हालचाल दिसल्याने सुरक्षा दलांनी या पाचजणांना हटकले. त्यानंतर त्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सुरक्षा दलाने केलेल्या गोळीबारात पाचही दहशतवादी ठार झाले. घटनास्थळावरून शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. सुरक्षा दलाकडून या पाचही जणांची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी २३ जुलै रोजी याच भागातून घुसखोरीचा आणखी एक प्रयत्न लष्कराने हाणून पाडला होता.
 
लष्कर कमांडर अबू दुजाना आणि महिलांसोबत कुकर्म :

 तोयबाचा कमांडर अबू दुजानाचा खात्मा करणे, हे भारतीय लष्कराचे मोठे यश होते. लष्कर कमांडर अबू दुजाना महिलांची छेडछाड करणे, त्यांना त्रास देणे यासाठी कुप्रसिद्ध होता. या भागातील महिलांमध्ये त्याची दहशत होती. तो कोणत्याही घरात घुसत होता आणि त्या घरातील महिलांसोबत कुकर्म करत होता. खोर्‍यातील महिला आणि मुलींमध्ये त्याची दहशत होती. त्याच्या धमक्या आणि कृत्यामुळे स्थानिक लोक त्रस्त होते. अबू दुजानाने नुकतेच पुलवामा येथील एका मुलीसोबत लग्न केले होते. महिला-पत्नीला भेटण्यासाठी तो नेहमी या भागात येत होता, अशीही माहिती आहे की, मंगळवारीही तो त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी आला होता. तिला घेऊन तो पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होता. अबू दुजाना काश्मीरमध्ये गेल्या सात वर्षांपासून सक्रिय होता. तो पाकव्याप्त काश्मीर गिलगिट-बाल्टिस्तानचा रहिवासी होता. त्याला पकडण्यासाठी सरकारने ३० लाखांचे बक्षीस जाहीर केले होते. अबू दुजानाने आत्मसमर्पण करावं, यासाठी लष्करी अधिकार्‍यांनी त्याची अगदी लहान मुलासारखी समजूत काढली होती, पण तो तयार झाला नाही आणि अखेर त्याचा ‘खेळ खल्लास’ करावा लागला!
 
 
‘‘पाकिस्तानी यंत्रणांनी माझा वापर करून घेतला, आता सगळा ‘खेळ’ माझ्या लक्षात आलाय,’’ असंही दुजाना या संभाषणात म्हणतो. त्यानंतर, काश्मिरी जनतेला त्रास न देण्याचे आवाहन अधिकारी करतात, त्याला शरण येण्याची विनंतीही करतात, पण त्याच्याकडून काहीच उत्तर येत नाही. काश्मिरी महिला आणि मुलींवर अत्याचार करूनही ही चकमक सुरू असताना स्थानिक तरुणांनी जवानांवर दगडङ्गेक केली. पण, त्याला न जुमानता सैन्याने आपली कामगिरी फत्ते केली. भारतीय लष्कराला देशाचे मानसिक पाठबळ पूर्णपणे मिळाले पाहिजे.

दहशवाद्यांनी स्थानिक तरुणांवर काय जादू केली आहे की, त्यांना आपल्याच महिलांच्या अब्रूपेक्षा जिहाद जास्त महत्त्वाचा वाटतो? काश्मिरी राजकीय पक्ष, तिथले विचारवंत, स्थानिक संस्था, तिथली मीडिया या विषयावर का चूप आहे? गेल्या काही दिवसांपासून तो जवानांच्या जाळ्यातही अनेक वेळा अडकला होता. पण, स्थानिक नागरिकांच्या सहकार्यामुळे तो स्वत:ला वाचविण्यात यशस्वी ठरला.
 
इंटरनेटच्या माध्यमातून पसरवला जातोय विद्वेष : 

काश्मीरच्या विविध भागांत संचारबंदी असताना व जवानांचा २४ तास पहारा असतानाही ङ्गुटीरतावादी व दहशतवादी काश्मीरमधील जनतेशी इंटरनेटच्या माध्यमातून संवाद साधत आहेत. ते इंटरनेटच्या माध्यमातून विद्वेषाचे जाळे पसरवत आहेत. ‘युनायटेड जिहाद कौन्सिल’चा अध्यक्ष सईद सलाहुद्दीन व ङ्गुटीरतावादी नेते अली शाह गिलानी यांनी यू-ट्यूब व इतर संकेतस्थळांवर विविध व्हिडिओ प्रसारित केले असून, काही सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांचाही वापर काश्मीरमध्ये भारतद्वेष पसरविण्यासाठी केला जात आहे. गेल्या काही वर्षांत काश्मीरमध्ये संकेतस्थळाचा या पद्धतीने वापर केला जात आहे. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रे, पत्रके, नियतकालिके याच्या माध्यमातून हुर्रियत कॉन्ङ्गरन्स काश्मीरमधील नागरिकांशी संपर्क साधत आहे. आयटी सुपर पॉवर असणारा आपला देश मात्र प्रचारयुद्धात त्यांच्या दहा वर्षे मागे आहे.
 
सार्वजनिक मुत्सद्देगिरी : एक दुर्लक्षित क्षेत्र : 

देशाने एक सार्वजनिक मुत्सद्देगिरीची मोहीमच सुरू करायला हवी आहे. ज्यामुळे काश्मीरबाबतचा विकृत केला गेलेला दृष्टिकोन सुधारू शकेल. सरकारच्या प्रशासनात, सार्वजनिक मुत्सद्देगिरी हे क्षेत्रच दुर्लक्षित राहिलेले आहे. अशा अपयशाचे उदाहरण काश्मीर आहे, जिथे भारत सरकार, सार्वजनिक मत भारताच्या बाजूने तयार करण्यात आपण अपयशी ठरलो आहोत.
 
 लोकांची मने जिंकण्याची लढाई :

काश्मिरातील युद्ध हे आता ङ्गक्त हिंसक-दगडफेकीगर्दी आणि कायदा प्रस्थापित करणार्‍या सुरक्षा दलांबरोबरचे प्रत्यक्षातील युद्ध राहिलेले नाही. जर सार्वजनिक मत हे अज्ञानी, अशिक्षित आणि काही राष्ट्रविरोधी व्यक्ती, संस्था, माध्यमांकडून कलुषित केले जात असेल, तर केवळ त्यांना दोष देणे पुरेसे ठरणार नाही. या अपप्रचारास योग्य ते स्पष्टीकरण देऊन उत्तर देण्याचे आव्हान सरकारपुढे आहे. उर्वरित जगापुढे भारताची भूमिका स्पष्ट करण्याचे काम नेमके कुणाचे आहे? परराष्ट्र खात्याचे. अधिक महत्त्वाचे हे आहे की, काश्मीरबाबत भारताची भूमिका आपल्याच लोकांना स्पष्ट करण्याचे काम नेमके कुणाचे आहे? राज्य सरकार, गृहखाते, संरक्षण खाते, माहिती आणि प्रसार खाते, पंतप्रधान कार्यालय, सार्वजनिक माहिती कार्यालय की दूरदर्शनचे? सद्य:परिस्थितीनुसार असे दिसते की, हे काम कुणाचेच नाही आहे. जेव्हा सत्ताधारी पक्षाचा प्रवक्ता मीडियासमोर सरकारचे समर्थन करण्यास उभा असतो, तेव्हा तो केवळ पक्षाचेच समर्थन करत असतो. देशाकरिता काहीच बोलत नाही. सार्वजनिक मुत्सद्देगिरी म्हणजे केवळ विशिष्ट नोकरशहांचा किंवा विशिष्ट खात्याचा समावेश करणेही नाही. भारत सरकारने सरकारच्या सर्वच खात्यांचा वापर करायलाच हवा. हे राष्ट्रीय महत्त्वाचे कार्य आहे, केवळ सार्वजनिक संबंधांचे नाही. सरकारने कार्यान्वित होऊन पूर्ण शक्तीसह या लढाईत उतरायला हवे आहे, हे माहितीचे युद्ध जिंकण्याकरिता!
 
माहितीचे युद्ध जिंकणे हे प्रत्येकच सरकारी खात्याचे काम असते. ही मोहीम काढण्यात गृहखात्याने पुढाकार घ्यायला हवा, पंतप्रधान कार्यालयाने, संरक्षण खात्याने आणि परराष्ट्र खात्याने त्यास सक्रिय समर्थन द्यायला हवे. संरक्षण खात्याने भूदलाचे अपप्रचारापासून रक्षण करायला हवे. सगळ्याच देशप्रेमी नागरिकांनी या लढाईत भाग घ्यायला हवा.
 
मनोवैज्ञानिक कारवाई कशी करावी :

एकदा का आपण काश्मीर खोर्‍यातील सर्व लोकांपुरती, हृदये आणि मनांची लढाई जिंकलो की मग, काश्मीरमधील छुपे युद्ध संपुष्टात आल्याचे घोषित केले जाऊ शकेल. म्हणूनच, प्रभावी मनोवैज्ञानिक कारवाईला आपली आधारभूत व्यूहरचना म्हणून स्वीकारले पाहिजे.
 
मनोवैज्ञानिक कारवाईचे उद्दिष्ट असावे : 

दहशतवाद्यांची लढण्याची इच्छाशक्तीच मोडून टाकणे व आपल्या समाजातील गैरमार्गावर चाललेल्यांना युवकांना मुख्य प्रवाहात आणणे. स्थानिक जनतेला, छुप्या युद्धाच्या समर्थकांना सक्रिय आधार देण्यापासून निवृत्त करणे, सामान्य नागरिकांमध्ये, सरकार आणि सुरक्षा दलाप्रतीचा आत्मविश्वास वाढवणे, सरकारने निर्माण केलेल्या प्रतिविद्रोह मोहिमेस स्वीकृती मिळवून देणे महत्त्वाचे आहे. दहशतवाद्यांच्या संबंधितांना, दहशतवादातील धोके आणि वैयर्थ समजावून देऊन अतिरेक्यांवर, अतिरेक सोडून देण्याकरिता दबाव आणण्याकरिता त्यांचा वापर करणे जरूरी आहे. सुरक्षा दलांचे मनोधैर्य उंचावून त्यांना दहशतवादीविरोधी अभियानात यश मिळविण्याकरिता प्रेरित ठेवणे ङ्गार महत्त्वाचे आहे.
 
दहशतवाद्यांची लढण्याची इच्छाशक्ती कमजोर करणारे योजनासूत्र : 

लोकांपासून आणि बाह्य मदतीपासूनचे दहशतवाद्यांचे वंचित असणे अधोरेखित केले जावे. दहशतवादी नेत्यांची वक्तव्ये, व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा, चैनी जीवनशैली यांची निम्न कार्यकर्त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखमय जीवनापासून झालेली ङ्गारकत उजागर करून कार्यकर्त्यांत उभी आणि आडवी ङ्गूट पाडली जावी. दहशतवाद्यांच्या नुकसानीवर भर देणे, त्यांच्या हालअपेष्टा, पकडले जाण्याचा कायमचा धोका, समोर आणणे, कडवे आणि ङ्गुटीरवादी हेच दहशतवादीच असल्याचे अधिरेखित करणे, यावर भर दिला पाहिजे.बळजबरीने, त्यांच्या आणि कुटुंबीयांच्या दहशतवादामध्ये मनाविरुद्ध भरती केलेल्या मुलांकडे आणि विद्यार्थ्यांकडे लक्ष वेधणे आणि त्यांच्या हालास व अंधकारमय भवितव्यास उजागर करणे अतिशय महत्त्वाचे आहे.
 
दहशतवाद्यांना स्थानिक लोकांच्या आधारापासून तोडणे :

त्याकरिता खालील गोष्टींवर प्रकाश टाकला पाहिजे. निरपराध नागरिकांच्या क्रूर हत्या, स्त्रियांच्या शोषणाकडे लक्ष, गरिबांना नाडण्याकडे लक्ष, दहशतवाद्यांना मदत करण्याकरिता नागरिकांवर होणार्‍या जुलूमावर लक्ष वेधून, दहशतवादी व स्थानिक लोकांत ङ्गूट पाडली पाहिजे. सामान्य लोकांचे आणि अर्थव्यवस्थेचे होणारे नुकसान समोर आणले पाहिजे.

यासाठी रेडिओपासून तर दूरदर्शन, सिनेमा आणि राष्ट्रीय व प्रादेशिक वृत्तपत्रे, यांना निवडलेल्या योजनासूत्राच्या प्रसारात सहभागी करून घ्यावे. प्रादेशिक वृत्तपत्रांना (कारण ते सामान्यतः पाकिस्तानची बाजू घेत असतात) अधिकृत प्रसाराकरिता राजी करून घ्यावे, न मानल्यास (सरकारी जाहिराती न देऊन) त्यांना तसे करण्यास बाध्य करावे.
 
मनोवैज्ञानिक युद्धप्रयास प्रभावी ठरण्याकरिता सहनशीलता आणि सातत्य महत्त्वाचे  :

मनोवैज्ञानिक युद्धप्रयास प्रभावी ठरण्याकरिता माध्यम चलाखी (गिमिक्स)चा सोपा मार्ग टाळावा. चुटकीसरशी कुठल्याही गोष्टी होत नसतात, छोट्या-छोट्या पायर्‍या-पायर्‍यांनीच प्रगती साधली जाऊ शकते. दीर्घकाळानेच लक्षात येण्यायोग्य परिणाम दिसून येऊ शकतात. गती वाढविण्याचे प्रयत्न करूच नयेत. मनोवैज्ञानिक युद्धप्रयास प्रभावी ठरण्याकरिता सहनशीलता आणि सातत्य महत्त्वाचे असते.
 
दहशतवादाच्या गुन्हेगारी कारवाया वातावरण उकळतच ठेवतील. ओ.जी. डब्ल्यू. देशविरोधी ओपिनिअन मेकर्स, अपप्रचाराची मोहीम सुरूच ठेवतील. आपणच बहुविध आव्हानांना समोर जाणे आवश्यक आहे.
 
 
राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रतिसाद देण्याची गरज राज्य सरकारने जम्मू आणि काश्मीर राज्यात लोकशाही बहरू द्यायला हवी आहे. लोकांची आणि अतिरेक्यांची हृदये आणि मने जिंकण्याकरिता माध्यमांचा प्रभावी उपयोग करून घ्यायला हवा आहे. सुशासन देण्याची राजकीय आणि प्रशासकीय इच्छाशक्ती कमी पडते आहे. राज्य सरकारने स्वच्छ, सक्षम आणि उत्तरदायी प्रशासन देण्याची गरज आहे. जम्मू आणि काश्मीरच्या आव्हानाकरिता सम्यज्ञक राजकीय, आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक प्रतिसाद देण्याची गरज आहे. हेही स्पष्ट आहे की, पाकिस्तानला होणारी चिनी लष्करी मदतही सुरूच राहील. अशा परिस्थितीत भारताचा प्रतिसाद आक्रमक असावा.
 
प्रभावी सार्वजनिक संपर्कयंत्रणा :

हे एक हत्यार आहे, जे परिस्थितीस दोन प्रकारे मांडू शकते. सरकारच्या पक्षकर किंवा विरोधी. सुरक्षादलांची प्रतिमा जपणे, दहशतवाद्यांना उघडे पाडणे, शत्रूच्या अपप्रचाराला सडेतोड उत्तर देणे, जनसमुदायास प्रेरित करणे, हे महत्त्वाचे ठरते. सरकारने प्रभावी सार्वजनिक संपर्कयंत्रणांचा वापर करावा. राज्याबाहेरील विद्वान संपादकांसहित काश्मिरी वृत्तपत्रे, टीव्ही, रेडियो, संकेतस्थळे चालवावीत. जम्मू आणि काश्मीर व उर्वरित देश यांतील विलगता दूर करण्याकरिता दळणवळणाची प्रणाली सुधारावी. उधमपूरला राज्याची आर्थिक राजधानी करावे. ज्यामुळे खोरे आणि जम्मू भागातील परस्परसंबंध वाढतील. प्रतिपाकिस्तानी आणि प्रतिअतिरेकी भावना जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रोत्साहित आणि प्रेरित करावी.
 
- (नि.) ब्रि. हेमंत महाजन