शेगाव येथे भरणार मराठी पत्रकार परिषदचे राष्ट्रीय अधिवेशन

    दिनांक  13-Aug-2017


(बुलढाणा) : मराठी पत्रकार परिषदेचे ४१ वे द्विवार्षिक राष्ट्रीय अधिवेश येत्या १९ व २० ऑगस्ट रोजी जिल्ह्यातील श्री क्षेत्र शेगाव येथे आयोजित करण्यात आले आहे. यासाठी राज्यभारातून पत्रकरांचा मेळा शेगाव येथे दाखल होणार असून  यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.


संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या आवारात हा दोन दिवसीय कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. १९ तारखेला सकाळी १० वाजता या अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात येणार आहे. प्रत्येक दिवसाचा कार्यक्रम हा तीन सत्रांमध्ये विभागण्यात आला असून पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर एक परिसंवाद व दुपारी चार वाजता दुसरे सत्र असणार आहे. या दुसऱ्या सत्रात पत्रकारांच्या न्यूजलेस कविता हा आगळावेगळा कार्यक्रम व त्यानंतर तिसऱ्या सत्रात मनोरंजनपर कार्यक्रम घेण्यात येणार असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.


यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची मुलाखत घेण्यात येणारा असून त्यानंतर शेतकऱ्यांच्या समस्यावर एक परिसंवादाचे आयोजन करण्यात येणार आहे. यामध्ये शेतकरी नेते व पत्रकार आपापली मते मांडणार आहेत. यानंतर दुपारच्या सत्रात पत्रकार संरक्षण कायद्याची माहिती आणि त्यावर चर्चा होऊन संध्याकाळी या अधिवेशनाची सांगता होणार आहे. संपूर्ण राज्यातून अंदाजे अडीच ते तीन हजार पत्रकार या अधिवेशानाला उपस्थित राहणार असल्याची माहिती संयोजकांनी दिली आहे.