ओबीसो विद्यार्थांच्या शिष्यवृत्तीतील कपात रद्द व्हावी

    दिनांक  01-Aug-2017


तुळजापूर (बुलढाणा) : ओबीसी गटातील विद्यार्थांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये सरकारकडून करण्यात आलेली कपात रद्द करण्यात यावी, अशी मागणी जिल्ह्यातील राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसकडून करण्यात आली आहे. यासंबंधी आज जिल्हाधिकाऱ्या संघटनेकडून एक निवेदन देखील देण्यात आले आहे.


केंद्र सरकारकडून ओबीसी गटातील विद्यार्थांसाठी वर्ष २०१४-१५ मध्ये ५५९ कोटी रुपयांचे अनुदान देण्यात आले होते. त्यानंतर २०१५-१६ मध्ये ते ५०१ कोटी, २०१६-१७ मध्ये ७८ कोटी तर यंदाच्या वर्षासाठी फक्त ५४ कोटी रुपये इतके अनुदान देण्यात आले असून हळूहळू ही योजना बंद करण्याचा राज्य सरकारचा हेतू असल्याचे सांगण्यात आले आहे. केंद्र सरकारकडून येणाऱ्या या अनुदानावर लाखो विद्यार्थांचे शैक्षणिक भवितव्य अवलंबून असून ही योजना बंद झाल्यास विद्यार्थांना पुढील शिक्षण घेणे अवघड होईल. त्यामुळे यावर वेळीच तोडगा काढण्यात यावा, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच ही मागणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण राज्यभर ओबीसी विद्यार्थाकडून आंदोलन पुकारले जाईल, असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे.