नागा बंडखोर आणि नेतृत्वबदल

    दिनांक  09-Jul-2017   
 

 
 
 
कालांतराने स्वतंत्र नागालँडसाठी लढणार्‍या गटांचे दोन मुख्य गट तयार झाले. पहिला एनएससीएन (आयएम) म्हणजे आयझॅक आणि मुवय्या आणि दुसरं एससीएनके म्हणजे (खपलांग). गेल्या वर्षी भारत सरकारशी एनएससीएन (आयएम) यांच्याबरोबर ऐतिहासिक शांतता करार केला. त्यानंतर या भागात शांतता नांदेल, अशी आशा पण निर्माण झाली.
 
एनएससीएन (खपलांग) या गटाचे प्रमुख एस. एस. खपलांग यांचा वयाच्या ७७व्या वर्षी म्यानमारच्या जंगलात नुकताच मृत्यू झाला. मात्र, माध्यमांनी या घडामोडीला अजिबात महत्त्व दिले नाही. नागालँड, ईशान्य भारताच्या आणि देशातील इतिहासात एनएससीएन (खपलांग) हा सर्वाधिक हिंसक बंडखोर समूह समजला जातो.
 
कालांतराने स्वतंत्र नागालँडसाठी लढणार्‍या गटांचे दोन मुख्य गट तयार झाले. पहिला एनएससीएन (आयएम) म्हणजे आयझॅक आणि मुवय्या आणि दुसरं एससीएनके म्हणजे (खपलांग). गेल्या वर्षी भारत सरकारशी एनएससीएन (आयएम) यांच्याबरोबर ऐतिहासिक शांतता करार केला. त्यानंतर या भागात शांतता नांदेल, अशी आशा पण निर्माण झाली.
 
रक्तरंजित संघर्ष संपण्याची शक्यता गेली ६० वर्षे सुरू असलेला रक्तरंजित संघर्ष संपण्याची शक्यता आहे. नागा बंडखोरांचा रक्तरंजित संघर्ष १९४७ पासून सुरू आहे. देशातील सर्वात पहिली बंडखोरी १९५० मध्ये नागालँडमध्ये सुरू झाली. त्यानंतर पुढच्या ३० वर्षांत भारतीय सैन्याने बंडखोरांविरुद्ध केलेल्या कारवाईमुळे या बंडखोरांना भारत सरकारशी वाटाघाटी करण्यास भाग पाडले. नागालँडमधील बंडखोरीला ‘मदर ऑङ्ग ऑल बंडखोरी’ असे म्हटले जाते. स्वतंत्र ग्रेटर नागालँडची मागणी करण्यात येत होती. या ग्रेटर नागालँडमध्ये नागालँडसह अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मणिपूरही आहे. नॅशनल सोशालिस्ट कौन्सिल ऑङ्ग नागलिंम (एनएससीएन) या नावाने बंडखोरांनी संघर्ष सुरू केला. पुढे या एनएससीएनचे अनेक गट तयार झाले.
 
बंडखोर गट वाटाघाटी टेबलावर :

 १९९० ते १९९७ पर्यंत प्रचंड प्रमाणात भारतीय सैन्याने दहशतवादविरोधी कारवाया केल्या. त्यामध्ये माझ्या स्वत:च्या बटालियन सात मराठा लाईट इन्ङ्ग्रंट्रीतील हवालदार काशीनाथ बोडके यांना दोन बंडखोरांना मारण्याकरिता सेनामेडल मिळाले होते. याच भागात मराठा रेजिमेंटचे कर्नल एन. जे. नायर यांना मरणोत्तर अशोकचक्र मिळाले होते. जवळपास साडेपाचशे जवान आणि अधिकार्‍यांनी गेल्या १५ वर्षांत नागा दहशतवादविरोधी कारवाया करताना, देशाचे रक्षण करताना आपल्या प्राणाचे बलिदान दिले आहे.
 
भारतीय सैन्य या भागात गेल्या अनेक वर्षांपासून दहशतवादविरोधी अभियानात सहभाग घेत आहे. त्यांनी केलेल्या यशस्वी कारवायांचा दबाव पडल्यामुळे शेवटी नाइलाज म्हणून नागा बंडखोरांनी शांतता चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. १९९७ मध्ये नागालँड बंडखोर गटांना कळाले की, भारतीय सैन्याशी लढून नागालँड स्वतंत्र करणे हे सोपे नाही, म्हणून त्यांनी भारत सरकारशी वाटाघाटी करायला सुरुवात केली. १९९७ सालापासून भारतीय सैन्य आणि नागालँडचे बंडखोर गट यांच्यामध्ये शस्त्रबंदी करार झाला. मात्र, एनएसीएन (खपलांग) शस्त्रसंधी आणि शांततावार्तांच्या विरोधात होते.
 
सद्यपरिस्थिती ही नेतृत्वबदलाची : 

१९५० पासून ते २०१७ पर्यंत ज्या जुन्या पिढीने या बंडखोरीचे नेतृत्व केले, त्यामधील खपलांग यांचा आता मृत्यू झाला आहे आणि एनएससीएम (आयएम)मधील आयझॅक यांचाही काही महिन्यांपूूर्वी मृत्यू झाला होता. आता जुन्या पिढीतील मुवय्या हेच ङ्गक्त शिल्लक राहिले आहेत. ८३ वर्षांच्या मुवय्यांची प्रकृतीसुद्धा ङ्गारशी चांगली नाही. त्यामुळेच सद्यपरिस्थिती ही नेतृत्वबदलाची आहे. आता नेतृत्वाची धुरा जुन्या पिढीकडून नव्या पिढीकडे सोपविण्यात येईल. ‘एनएससीएनके’ या गटाचे नेतृत्व खांगो कोनियाक या बंडखोरांकडे गेलेले आहे. खपलांग हे म्यानमारमध्ये राहणारे नागा होते. नागा जमात ही नागालँड, मणिपूर आणि आसामच्या काही भागांत वसलेली आहे. याशिवाय हीच नागा जमात भारताच्या सीमेच्या पुढे म्यानमारमध्येही पसरलेली आहे. या भागाचे नेतृत्व खपलांग हे करत होते. मात्र, नागालँडपेक्षाही म्यानमारमधील नागा लोकांवर त्यांचे विशेष प्रेम होते. आता त्यांच्यानंतर नियुक्त झालेले खांगो कोनियाक हे मात्र भारतीय नागा आहेत. म्हणून आता नागालँडच्या बंडखोरीचा इतिहास महत्त्वाच्या टप्प्यावर आला आहे.
 
नवीन नेतृत्वाला जुन्या पिढीप्रमाणे स्वातंत्र्यासाठी नुसता हिंसाचार सुरू ठेवायचा की, भारतामध्ये सामील होऊन उर्वरित भारताचा झपाट्याने विकास होतो आहे, त्याप्रमाणे नागालँडचा विकास होण्यास चालना द्यायची हे ठरवायचे आहे. लवकरात लवकर त्यांच्याशी संपर्क प्रस्थापित करून त्यांनासुद्धा शांतता चर्चेत सामील करून घेण्याची गरज आहे.
 
खपलांग महात्मा नव्हते : 

खपलांग यांच्या मृत्यूनंतर नागालँडमधील वर्तमानपत्रात त्यांच्याविषयी अनेक चांगले लेख लिहून आले. मात्र, खपलांग हे कोणी महात्मा नव्हते. ते अतिशय हिंसक असे नागा बंडखोर होते. नागालँड मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली वाहून ते एक महान व्यक्ती होते, असा त्यांचा उल्लेख केला. हे अर्थातच मतपेटीचे राजकारण आहे. नागालँडमध्ये १५ जून, २०१६ मध्ये लष्कराच्या डोगरा बटालियनवर झालेल्या एनएससीएनएन केच्या हल्ल्यानंतर १८ जवानांचा त्यात मृत्यू झाला होता. त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून म्यानमारमध्ये प्रवेश करून एनएससीएनकेच्या बंडखोर बेसवरती, राहण्याच्या ठिकाणांवर हल्ला करून ४० नागा बंडखोरांना कंठस्नान घालण्यात यश मिळाले होते. १९५० मध्ये देशात सर्वात पहिली बंडखोरी मिझोराममध्ये ङ्गिजो यांनी सुरू केली. १९५० मध्ये ङ्गिजो यांनी त्या काळच्या बांगलादेशमध्ये प्रवेश केला आणि त्यापाठोपाठ इतर नागा बंडखोरही तिथे गेले. १९६२-१९६८ या कालावधीमध्ये २,५०० नागालँडच्या बंडखोरांना सध्याच्या बांगलादेशमधील चितगाव डोंगरांमध्ये लढण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. १९७१ मध्ये बांगलादेश स्वतंत्र झाल्यानंतरसुद्धा अनेक वर्षे पाकिस्तान आणि ‘आयएसआय’चा प्रभाव बांगलादेशवर होता. त्यामुळे बांगलादेशात बंडखोरांना शस्त्रसाठा, प्रशिक्षण देता येत होते. बांगलादेशच्या सध्याच्या पंतप्रधान शेख हसिना गेल्या सात वर्षांपासून सत्तेवर आल्यानंतर नागा बंडखोरांचे इथले अड्डे बंद करण्यात आले आहेत.
 
एनएससीएन (आयएम) या नागालँडच्या बंडखोरांशी शांतता करार झाल्यामुळे तिथे हिंसाचार कमी झाला. मात्र, दुसरा परिणाम असा झाला की, हिंसाचार कमी झाल्यानंतर त्या भागात बांगलादेशी निर्वासितांचे प्रमाण वाढले आणि नागा बंडखोरांनी आपले खंडणी राज्य सुरू केले. सध्या नागालँडमध्ये तिथल्या लोकांनी निवडलेले सरकार राज्य करत आहे.

नागा मुलींशी विवाह - ‘सुमिया’ जमात : 

अनेक घुसखोरांनी नागा मुलींशी लग्ने करायला सुरुवात केली. जमातीच्या बाहेर लग्न न करणार्‍या नागा मुलींनी आता बांगलादेशी मुसलमानांशी लग्ने केली आहेत. याविषयी तेथील राजकीय पक्ष उघडपणे बोलायला तयार नसतात, पण सुमी जमातीच्या नागा मुली आणि बांगलादेशींपासून तयार झालेल्या जमातीला आता ‘सुमिया’ जमात म्हटले जाते. ही संख्या १०-१५ टक्क्यांच्या मध्ये आहे. तीन लाख संख्येमुळे आज घुसखोर नागालँडची सर्वात मोठी जमात बनली आहे.
 
हे घडले, कारण नागालँडच्या सामान्य नागरिकांना मजुरी किंवा शारीरिक मेहनतीची कामे करायला आवडत नाहीत. त्यांची पुष्कळशी शेती बांगलादेशी घुसखोर करतात. नागालँडमध्ये मजुरी आणि मेहनतीची कामे हे घुसखोर कमी पैशांमध्ये करतात. राजधानी दिमापूर मिनी बांगलादेश बनले आहे. मुस्लीम सणाच्या वेळेस आणि प्रार्थनांच्या वेळेस दिमापूर शहर पूर्ण बंद पडते. त्यामुळे काही वर्षांनंतर बांगलादेशी घुसखोर दिमापूरला वेगळ्या राज्याचा दर्जा देण्याची मागणी करू शकतात. बांगलादेशचा भाग म्हणूनही मागणी केली जाऊ शकते.
 
भारतविरोधात लढा : 

मागच्या वर्षी भारत सरकारशी एनएससीएन (आयएम) यांच्याबरोबर शांतता करार झाल्यानंतर लगेचच एनएससीएन (खपलांग) यांच्या नेतृत्वाखाली ‘युनायटेड नॅशनल लिबरेशन ङ्ग्रंट वेस्ट ऍण्ड साऊथ ईस्ट एशिया’ नावाच्या कराराखाली ईशान्य भारतातील सर्वच बंडखोरांना एकत्रित करून भारत सरकारविरोधात एकत्रित लढा देण्यास सुरुवात केली आहे. यात आसाममधले ‘उल्ङ्गा’ या बंडखोर गटाचे परेश बरुआ सामील आहेत, तसेच मणिपूरमधील वेगवेगळे गट सामील आहेत. एवढेच नव्हे, तर नागा बंडखोरांशी लढण्यास असमर्थ असलेल्या म्यानमार सरकारने या बंडखोरांना म्यानमारमध्ये राहण्याकरिता आणि प्रशिक्षण कॅम्प उभारण्याकरिता परवानगी दिलेली आहे. म्हणजेच शांततेकरिता म्यानमार सरकारने ‘या भागांत तुम्ही राज्य करा, पण इतर भागांत हिंसाचार करू नका,’ असाच करार नागा बंडखोर गटांशी केला आहे. नागा बंडखोरांना केवळ हिंसाचार करण्यात यश मिळते, मात्र स्वतंत्र नागालँडची त्यांची इच्छा कधीही पूर्ण होऊ शकणार नाही. त्यामुळे हिंसाचाराची वाट सोडून शांततेच्या मार्गाने वाटाघाटीत सामील व्हा, भारताच्या प्रगतीतील एक भाग बना याची नव्या नेतृत्वाला जाणीव करून देण्याची गरज आहे.
 
इतर राज्यांत नागाबहुल भाग नागालँडमध्ये सामील करून घेता येणार नाही, त्यांना जाणीव करून देणे गरजेचे आहे. मणिपूरच्या आत राहणार्‍या नागा जमातीला आपण अधिक स्वातंत्र्य/स्वायत्तता देऊन आपण खूश ठेवू शकतो. त्यामुळे खपलांग यांच्या मृत्यूपश्चात ही वेळ सर्व गटांना एकत्र आणून हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेच्या प्रक्रियेत सामील होण्याकरिता दबाव आणता येण्यास अनुकूल आहे. नागालँडमध्ये असलेल्या ‘होहो’ या नागालँडमधील जमातींच्या बिगरसरकारी संस्थेचा वापर या वाटाघाटीसाठी करता येईल. त्याशिवाय या भागात चर्चचा पुष्कळ प्रभाव आहे. त्यांच्या मदतीने बंडखोरांवर दबाव आणून शांततेच्या मार्गावर आणणे जरूरी आहे.
 
१९८० ते ९०च्या दशकामध्ये नागालँड आणि इतर बंडखोरांची प्रशिक्षण केंद्रे ही चीनच्या युनान प्रांतामध्येसुद्धा होते. मात्र, हे कॅम्प आता बंद करण्यात आले आहेत. चीनने पुन्हा ईशान्य भारतातील बंडखोरांना मदत देण्यास सुरुवात केल्याचे वृत्त आहे. ‘उल्ङ्गा’ या बंडखोर संघटनेचे नेते परेश बरुआ यांच्या आजारपणात चीनच्या युनान प्रांतात उपचार करण्यात आले. चिनी गुप्तहेर संस्था नागालँडमधल्या बंडखोरांबरोबर पुन्हा संपर्क करून त्यांना मदत देण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे खपलांग यांच्या मृत्यूनंतर ही ऐतिहासिक संधी नव्या नेतृत्वाबरोबर मिलाप करून त्यांना हिंसाचाराचा मार्ग सोडून शांततेचा मार्ग अवलंबण्याची हीच योग्य वेळ आहे.
 
-(नि.) ब्रि. हेमंत महाजन