माजी सैनिकांच्या पाल्यांकरिता शिक्षणासाठी आर्थिक मदत मिळणार

    दिनांक  06-Jun-2017

 

अर्ज ऑनलाइन उपलब्ध करण्यात आले आहेत - जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी

केंद्रीय सैनिक कल्याण बोर्ड, नवी दिल्ली यांच्याकडून माजी सैनिक, युद्ध विधवा, विधवा व अवलंबित यांच्या पाल्यांकरिता आर्थिक मदत देण्यात येते. इयत्ता ९वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी ३० जून २०१७ पर्यंत अर्ज करावे तर इयत्ता १०वी व १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ३१ जुलैपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी ३१ ऑगस्ट २०१७ ही अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे.

 

सर्व अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, बुलडाणा येथे सादर करावीत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांच्या वतीने करण्यात आले आहे. अर्जासोबत विद्यार्थ्याचा स्वत:चा पासपोर्ट फोटो, डिस्जार्ज पुस्तकाची पूर्ण झेरॉक्स, मागील वर्षी पास झाल्याची गुणपत्रिका, माजी सैनिकाचे ओळखपत्र, माजी सैनिकाचे व पाल्याचे आधार कार्ड, अन्य संस्थेकडून कोणतीही आर्थिक मदत मिळत नसल्याबाबतचे माजी सैनिकाचे स्वयं-घोषणापत्र, एसबीआय किंवा पंजाब नॅशनल बँकेच्या पासबुकच्या पहिल्या पानाची झेरॉक्स, पीपीओ आणि स्वत:चा इमेल ॲड्रेस पासवर्डसह आणणे आवश्यक आहे. आरएमडीएफच्या मदतीची प्रकरणे सेक्रेटरी केंद्रीय सैनिक बोर्ड, नवी दिल्ली www.ksb.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावीत.

 

यासाठी बस स्थानकाजवळील जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय बुलडाणा येथे संपर्क साधणे गरजेचे आहे. ही सर्व ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण करून अर्ज व स्वयंघोषणापत्र जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात जमा करावेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.