किमान कौशल्यावरील अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशाची मुदत वाढवली

    दिनांक  19-Jun-2017

 

१. www.mscert.org.in या संकेतस्थळावर ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू

२. अर्जाची प्रत व त्यासोबत अपलोड केलेल्या कागदपत्रांच्या प्रती ३० जून २०१७ पर्यंत सादर कराव्यात

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था, बुलढाणा यांचे आवाहन

किमान कौशल्यावर आधारित शैक्षणिक वर्ष २०१७-१८साठी डी.एल.एड (डिप्लोमा इन एलिमेंटरी एज्युकेशन) या अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षाचे प्रवेश ऑनलाईन पद्धती करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. मार्चमध्ये १२वीच्या परीक्षांचे निकाल लागल्यावर प्रवेशप्रक्रिया १८ जून २०१७पर्यंत ऑनलाईन स्वरूपात सुरू होती. मात्र अर्जस्वीकृतीला ३० जून २०१७पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. यासाठी प्रत्येक विद्यार्थ्यांकडे आधी इमेल आयडी आवश्यक असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

 

कॅशलेस प्रवेश शुल्क भरणा योजनेला विद्यार्थांचे प्राधान्य

तसेच अर्जदारांना एकापेक्षा जास्त माध्यमासाठी अर्ज  करावयाचा असेल, तर प्रत्येक माध्यमास संवर्गानुसार स्वतंत्र आवेदन पत्र शुल्क भरावे लागणार आहे. प्रवेश अर्ज शुल्क ऑनलाईन बँकिंग, विविध इ-वॉलेट आणि स्वत:चे किंवा नातेवाईकांच्या क्रेडीट कार्ड, डेबिट कार्डद्वारे स्वीकारण्यात येत आहेत. कॅशद्वारे प्रवेश शुल्क भरण्यापेक्षा कॅशलेसचा पर्याय अधिक वापरला जात असल्याची माहिती बुलढाणा जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेच्या वतीने प्राचार्य समाधान डुकरे यांनी दिली आहे.

Embeded Object

पात्रता निकष (कट ऑफ)

कला, वाणिज्य, विज्ञान किंवा एमसीव्हीसी शाखेतील १२वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना खुल्या प्रवर्गासाठी किमान ४९.५ टक्के गुण तर मागासवर्गीय संवर्गासाठी किमान ४४.५ टक्के गुणांसह असणे आवश्यक आहे. प्रवेश अर्ज ३० जून २०१७पर्यंत सादर करणे गरजेचे आहे.