मुख्यमंत्र्यांनी घेतला बुलढाणा जिल्ह्यातील शेतीचा पावसापूर्वीचा आढावा

    दिनांक  06-May-2017


 

शेती संदर्भातील योजना, विकास प्रकल्प व शेतकरी हिताचे कार्यक्रम यांची अंमलबजावणी आणि प्रत्यक्षातील फलित काय असेल याचा अंदाज घेण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज बुलढाणा जिल्ह्यात आढावा दौरा केला. यामध्ये गटशेती व सिंचन योजना, मागेल त्याला शेततळ अशा विविध योजनांची माहिती त्यांनी घेतली.

ते म्हणाले, खारपण पट्ट्यात मोठ्या प्रमाणात शाश्वत शेती व्हावी यासाठी मुख्यमंत्र्यांनी आज शेकर-यांशी संवाद साधला. या बृह्त कार्यक्रमांतर्गत जागतिक बँकेच्या वतीने महाराष्ट्र शासन शेतक-यांना शेतीसंदर्भात उपलब्ध सर्व योजना एकत्रितपणे उपलब्ध करून देईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. खांडवी इथे झालेल्या या चर्चेत शेतक-यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

गटशेतीसाठी १०० एकर जमीन व किमान २० शेतकरी असा प्रयोग केल्यास सरकारच्या सर्व योजना या शेतक-यांना एकत्रित देऊ. यासाठी ५० लाखांपर्यंत सहकार्य शासन करेल. या उन्हाळ्यात व पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे सुरू झाली पाहिजेत हा मुख्यमंत्र्यांचा आग्रह आहे. यासाठी त्यांनी आज बुलढाण्याचा दौरा केल्याची माहिती माध्यम प्रतिनिधींशी बोलताना दिली.

या दौ-यात पंतप्रधान आवास योजनेतील घरांची त्यांनी पाहणी केली. यावेळी एका ज्येष्ठ महिलेने मुख्यंमंत्र्यांना ओवाळणी करून नवीन व संरक्षित घराचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे आनंद व्यक्त केला.

Embeded Object

गाडेगांवमधील शेतक-यांशी चर्चा त्यांनी केली आणि सर्व योजना कशा वापरल्या जाऊ शकतात, त्यांचे अधिक फायदे यांची विस्ताराने माहिती दिली. बुलढाणा जिल्ह्यातील गाडेगांव येथे मागणीनुसार शेत तळे प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा त्यांनी घेतला. शाश्वत सिंचनासाठी सरकार करीत असलेल्या प्रयत्नांबाबत खांडवी येथे माध्यमांशी संवाद साधला.

गाडेगांव खुर्द येथे प्रगतीपथावर असलेल्या वनराई बंधा-याची गती वाढविण्याच्या कामाची त्यांनी पाहणी केली. ५ टीसीएम पाणी साठवण क्षमता असलेल्या या कामासाठी ४ लाखपेक्षा अधिक खर्च राज्य शासन करीत आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील विविध कामे आणि योजनांचा आढावा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका बैठकीतून घेतला. मुख्यमंत्र्यांनी यावेळी तालुकानिहाय आढावा प्रत्येक नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांकडून घेतला. मंत्री रणजित पाटील यावेळी उपस्थित होते. या बैठकीत जलयुक्त शिवार, शेततळे, शहरे हागणदारीमुक्त करणे, प्रधानमंत्री आवास योजना, पीककर्ज वाटप यांचा समावेश होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिगाव प्रकल्प मुख्यमंत्री वॉररूम अंतर्गत घेण्याचे निर्देश दिले. उर्वरित कामं कुठल्याही स्थितीत पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावीत, असेही निर्देश त्यांनी दिले.

Embeded Object