पाच दिवसांचा आठवडा व सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी राज्य सरकार अनुकूल - ग. दि कुलथे

    दिनांक  31-May-2017


 

शासकीय कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा करण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार सकारात्मक आहे. तसेच सातवा वेतन आयोग लागू करण्यासही अनुकूल आहे. याबाबत शासनाशी महासंघाची यशस्वी चर्चा झाली आहे, अशी माहिती आज महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाचे मुख्य सल्लागार ग.दी कुलथे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाच्या बुलडाणा जिल्हा कार्यकारीणीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते.

राज्य शासनाने नागरिकांना विहीत कालावधीत सेवा मिळवून देण्यासाठी सेवा हमी कायद्याची निर्मिती केली आहे. या कायद्यानुसार विविध विभागांच्या ३६९ सेवा निर्धारित कालावधीत देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्याने सेवा हमी कायद्यात दिलेल्या कालावधीपेक्षाही आणखी कमी कालावधीत नागरिकांना सेवा देण्याचा प्रयत्न करावा. या कायद्याद्वारे आपल्या कामाचा ठसा उमटवावा, असे प्रतिपादन ग.दी कुलथे यांनी केले आहे.

शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत बोलताना कुलथे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी महासंघाचे शासनाला सहकार्य आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण केल्यानंतर महासंघ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करेल.