बारावीच्या निकालात जिल्ह्यात एकूण आकडेवारीत मुलांची बाजी, टक्केवारीत मुली आघाडीवर

    दिनांक  30-May-2017


 

देऊळगाव राजा तालुक्याचा सर्वांत जास्त ९५.५८ टक्के निकाल

जिल्ह्यात एकूण २९३० विद्यार्थी अनुत्तीर्ण;

राज्यभरात आज उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षांचा निकाल जाहिर झाला. बुलढाणा जिल्ह्यात उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांत १५ हजार ९३० विद्यार्थी तर १३ हजार ९ विद्यार्थीनी आहेत. ही परीक्षा देणारे जिल्ह्यात एकूण ३१ हजार ८६९ परीक्षार्थी होते. एकूण २८ हजार ९३९ परीक्षार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेत बुलडाणा जिल्ह्याचा एकूण निकाल ९०.८१ टक्के नोंदविण्यात आला आहे.
देऊळगाव राजा तालुक्याचा सर्वांत जास्त ९५.५८ टक्के निकाल लागला आहे. त्या पाठोपाठ सिंदखेड राजा तालुक्याचा ९३.८४ टक्के तर बुलढाणा तालुक्याचा ९२.२९ टक्के निकाल लागला आहे. संग्रामपूर तालुक्याचा सर्वांत कमी म्हणजेत ८७.१२ टक्के निकाल लागला आहे.

व्होकेशनल व वाणिज्य शाखेकडे कल कमी, सर्वाधिक ओढा कला शाखेकडे

जिल्ह्यात विज्ञान शाखेमध्ये परीक्षेसाठी १० हजार १९८ परीक्षार्थ्यांनी नोंदणी केली होती, तर कला शाखेत १९ हजार १४१, वाणिज्य शाखेत १००७ व व्होकेशनल शाखेत ९८९ परीक्षार्थ्यांची नोंदणी होती. विज्ञान शाखेत प्राविण्य श्रेणीत ११२८, ग्रेड एक मध्ये ६०२३, ग्रेड दोन मध्ये ४४४३ आणि उत्तीर्ण श्रेणीत ९१ परीक्षार्थी आहेत. विज्ञान शाखेचा निकाल ९७.३९ टक्के लागला असून कला शाखेचा निकाल ८५.९० टक्के आहे. तसेच वाणिज्य शाखेचा ९१.२४ आणि व्होकेशनलचा निकाल ८४.७१ टक्के आहे.