दिव्यांगांसाठी ग्रामपंचायत निधी न वापरल्यामुळे आंदोलनाचा इशारा

    दिनांक  03-May-2017


प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वार्षिक खर्चतील ३ टक्के निधी हा दिव्यांगांसाठी खर्च करण्याचे आदेश राज्य शासनाने दिले आहेत. परंतु बुलढाणा जिल्ह्यातील एकाही ग्रामपंचायतने दिव्यांगांसाठी आजपर्यंत हा निधी खर्च केलेला नाही. त्यामुळे दिव्यांगांना समाजात समान हक्क दिला जात नसल्याचे चित्र जिल्ह्यात दिसत आहे. ग्रामपंचायतीच्या या सावळ्या गोंधळा विरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन, विदर्भ या संघटनेच्या वतीने येत्या ८ मे रोजी मोताळा तालुक्यातील पंचायत समिती कार्यालय समोर आंदोलन करण्याचा निर्णय मोताळा ग्रामस्थांनी केला आहे.


या आंदोलनासाठी आज एका नियोजन सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिव्यांगांना शिक्षणासह मुलभूत अधिकारी मिळावे यासाठी सर्वानुमते एक ठरवाही मंजूर करण्यात आला. यामध्ये दिव्यांगांसाठी शाळेत जाण्याचा अधिकार, प्रवास व समाजाच्या कार्यात सहभागी होण्याचा अधिकार तसेच अधिकाधिक पालकांनी आपल्या दिव्यांग मुलांना शाळेत पाठवावे यासाठी जनजागृती करणे यागोष्टींचा समवेश या ठरावात केला गेला आहे. सर्व प्रकारांच्या दिव्यांगांसाठी विशेष शिक्षकांची नेमणूक केली जाते. त्यामुळे वेगळ्या शाळेपेक्षा सर्व मुलांसोबतच या विद्यार्थ्यांना देखील शिक्षण दिले जावे असेही ग्रामस्थांनी या सभेत नमुद केले.