शॉर्ट अॅण्ड क्रिस्प "फर्स्ट सनडे"

02 May 2017 17:30:05




कधी कधी कसं होतं ना, आपल्याही नकळत आपल्या घरातील वडीलधारी माणसं एकटी पडतात. चूक कुणाचीच नसते. नोकरीच्या, कामाच्या निमित्ताने मुलं, सूना, नातवंडं गावाबाहेर, कधी कधी देशाबाहेरही जातात. अशा वेळी इच्छा नसतानाही ही वडीलधारी माणसं एकटी पडतात. आपल्या मुलांना, नातवंडांना पाहण्याचा एक मात्र मार्ग म्हणजे, तंत्रज्ञान. पण ते तंत्रज्ञान शिकवून द्यायला ही कुणी नसतं. एकटेपणा आणि त्याचं दु:ख हे वाईट असतं. फर्स्ट सनडे ही अशीच एक कहाणी आहे, एका आज्जीची. नातीच्या वाढदिवसानिमित्त तिला व्हिडियो कॉल करुन सरप्राईज करण्याची या आज्जीची इच्छा असते. त्यासाठी ती २ महीने पैसेही गोळा करुन स्मार्ट फोन विकत घेते. मात्र तो वापरायचा कसा हेच मुळी तिला माहीत नसतं.

Embeded Object

याच आज्जींकडे एक पेईंग गेस्ट असतो. आधी त्याला ही आज्जी हिटलर आणि तिला तो वाया गेलेलाच वाटत असतो. पण या स्मार्ट फोनचा वापर शिकवण्यामुळे त्यांच्यातही मैत्री होते. आज्जी आणि त्या तरुणाची मैत्री खूप गोड भासते. हा लघुपट खूप वेग वेगळे इमोशन्स दाखवणारा आहे.

खरं तर हा लघुपट फ्रेंडशिप डे च्या निमित्ताने आला होता. मात्र केव्हाही आणि कितीही वेळा बघितला तरीही तो आपलासाच वाटतो. या लघुपटाचे दिग्दर्शन केले आहे श्रीमंता सेनगुप्ता यांनी. या लघुपटाला आता पर्यंत 158,687 व्ह्यूज मिळाले आहे. आवर्जून बघावा असा हा लघुपट आहे.

Powered By Sangraha 9.0