मराठवाड्यातील ११,४५७ रास्त भाव दुकानात ई-पॉज मशिनद्वारे व्यवहार- महेश पाठक

15 May 2017 10:16:20

मराठवाड्याच्या एकूण ८ जिल्ह्यातील ११ हजार ४५७ रास्त भाव दुकानात ई-पॉज मशिनद्वारे धान्य वाटपाचे आणि रक्कम अदा करण्यासह सर्व व्यवहार केले जाणार असून आतापर्यंत ६ हजार ४४८ रास्त दुकानात ई-पॉज मशिन्स स्थापित झाल्या आहेत, अशी माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी दिली.

नुकत्याच झालेल्या जिल्हाधिकारी कार्यालयात मराठवाड्यातील सर्व अन्न, धान्य पुरवठा बायोमॅट्रीक पद्धतीने करण्यासंबंधात आयोजित बैठकीत पाठक बोलत होते. बापट म्हणाले, ई-पॉज मशिन्स बसविण्याचे काम जिल्हानिहाय तीन टप्प्यात पूर्ण करण्यात येत आहे. तिसऱ्या टप्प्यामध्ये औरंगाबाद, परभणी, बीड यांचा समावेश आहे. लातूर, नांदेड, जालना, उस्मानाबाद, हिंगोली या जिल्ह्यात ई-पॉज मशिन बसविण्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. औरंगाबाद जिल्ह्यासाठी १ हजार ई-पॉज मशिन्स प्राप्त झाले आहेत तर परभणी आणि बीडसाठी मशिन्स अप्राप्त आहेत. ई-पॉज मशिन बसविताना अनेक तांत्रिक अडचणी येत आहेत. त्या सोडविण्याचा प्रयत्न देखील केला जात आहे.

अन्न, धान्य वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी जिल्हानिहाय ७७ संगणक वितरीत करण्यात आले. हे संगणक जिल्हा पुरवठा कार्यालयापासून ते तहसील व गोदामापर्यंत कार्यान्वित करण्याचे काम सुरु आहे. गोदामामध्ये लॅपटॉपदेखील पुरविण्यात येत आहे. त्यामुळे आता गोदामामध्ये व रास्त भाव दुकानात झालेले धान्य वितरण कोणालाही ऑनलाईन पाहता येईल. रास्त भाव दुकानदारांना चलनाने बँकेत रक्कमा भरावा लागायचा, आता मात्र रास्त भाव दुकानदारांना ऑनलाईन चलन भरता येणार आहे. मराठवाड्यातील एकूण ११ हजार ४५७ रास्त भाव दुकानदारांनी जी.आर.ए.एस. प्रणालीद्वारे १० हजार २३८ सर्व शिधापत्रिकांचे आधार सिडींग मराठवाड्यात ९९ टक्के झाले आहे. मराडवाड्यात एकूण ४७,38,०६७ एवढ्या शिधापत्रिका आहेत. त्याचप्रमाणे ११ हजार ४५७ भाव दुकानदार व त्यांच्याकडील कार्ड व त्यावरील लाभार्थ्यांच्या खात्याचे आधार कार्डशी लींकअप करण्यात आले आहे. आतापर्यंत ५४,६९,४७५ एवढ्या आधारशी बँक खाते लिंक झाले आहे, अशीही माहिती यावेळी सांगण्यात आली.

राम यांनी बायोमॅट्रीकमुळे औरंगाबाद जिल्ह्याची पारदर्शक ओळख निर्माण होणार आहे. जिल्ह्याला दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात येईल. प्रचार व प्रसिद्धी वर भर देण्यात येईल. रास्त भाव दुकानात धान्य आल्याचे एस.एम. एस. शिधापत्रिकाधारकांना पाठविले जातात, अशी माहिती दिली. 

Powered By Sangraha 9.0