ग्राहक तक्रारींचे प्राधान्याने निरसन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    दिनांक  13-May-2017सेट टॉप बॉक्स व केबल जोडणी झाल्यावर प्रत्येक ग्राहकाला पावती देण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी आज सूचना दिल्या. ते म्हणाले, केबल चालकांनी सेट टॉप बॉक्स खरेदीची पावती संबंधित ग्राहकाला द्यावी. तसेच दरमहा केबल जोडणीच्या वसूलीची पावतीही द्यावी. हा ग्राहकांचा अधिकार आहे. ऑफलाईन शक्य नसेल, तर डिजीटल स्वरूपात द्यावी. याबाबत करमणूक कर विभागाने सर्व केबल ऑपरेटर्संना पत्र पाठवून पावती देण्याविषयी सक्ती करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या आहेत. ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.


ग्राहक संरक्षण परीषदेच्या माध्यमातून येणाऱ्या ग्राहकांच्या तक्रारी व अडचणी तातडीने सोडविल्या पाहिजेत. आलेल्या तक्रारींचे निरसन करून त्यांचे समाधान केले पाहिजे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, करमणूक कर विभाग, भारत संचार निगम लिमीटेड यांनी ग्राहकांच्या तक्रारींना प्राधान्य देऊन त्या निकाली काढाव्यात, अशा सूचना जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज दिल्या.