धुळे जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त १४ शेतकरी कुटुंबांना मिळणार मदत

29 Apr 2017 18:32:52


 

शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीच्या आज झालेल्या बैठकीत १४ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयातील सातपुडा सभागृहात आज सकाळी शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे हे अध्यक्षस्थानी होते.

यावेळी जिल्हा परिषदेच्या कृषी समितीच्या सभापती लीलावती बेडसे, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, उपविभागीय अधिकारी गणेश मिसाळ (धुळे), नितीन गावंडे (शिरपूर), तहसीलदार दत्ता शेजूळ (महसूल), अमोल मोरे (धुळे ग्रामीण), संदीप भोसले (साक्री), रोहिदास वारुळे (शिंदखेडा), ज्योती देवरे (धुळे शहर), अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रदीप गिलाणकर उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्या निर्मूलन व सहाय्यता समितीच्या बैठकीत एकूण १५ प्रस्ताव मांडण्यात आले होते. त्यात धुळे तालुक्यातील ६ , साक्री तालुक्यातील ५ , तर शिंदखेडा तालुक्यातील ४ प्रस्तावांचा समावेश होता. त्यापैकी एक प्रस्ताव अपात्र ठरला. फेरचौकशीसाठी पाठविलेल्या प्रस्तावांची चौकशी करुन ते पुढील बैठकीत सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी यावेळी दिले.

 

Powered By Sangraha 9.0