इस्रोने विकसित केले 'सोलर कॅलक्युलेटर अॅप'

28 Apr 2017 12:18:16



भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) एक नवीन मोबाईल अॅप विकसित केले आहे. या नवीन अॅपच्या माध्यमातून जगातील कोण्या ठिकाणी किती सौर उर्जा तयार होऊ शकते, याचे अचूक मोजमाप करता येते. गेल्या काही दिवसांपूर्वीच इस्रोने हे अॅप तयार केले आहे. तसेच त्याची यशस्वी चाचणी देखील केली आहे.


अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाच्या आग्रहावरून इस्रोच्या अहमदाबाद येथील स्पेस अॅप्लिकेशन सेंटरने हे अॅप बनविले आहे. या अॅपच्या माध्यामतून जगभरातील कोणत्याही ठिकाणी एका वर्षात किती सौर उर्जा तयार होईल याची आकडेवारी नागरिकांना मिळणार आहे. यासाठी हे अॅप उपग्रहाच्या मदतीने उपयोगकर्त्याने निवडलेल्या ठिकाणी सूर्याची किरणे किती प्रमाणत पोहचतात, त्यांच्या परिवर्तनाचे प्रमाण तसेच तेथील तापमान यांच्या माहिती गोळा करेल. तसेच यासर्वांच्या मदतीने एका सौर यंत्राच्या माध्यमातून वर्षाला किती सौर उर्जा तयार होईल याची माहिती उपयोगकर्त्याला देईल.

Powered By Sangraha 9.0