बळीराजाची चेतना जाणणाऱ्यांचा सन्मान

28 Apr 2017 08:09:40


शेती आणि शेतजमिनीच्या सर्व व्यवहार हे तलाठ्याशिवाय होऊ शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतजमिनी संबंधी कोणत्याही कामासाठी तलाठी कार्यालायात जावे लागते. परंतु कार्यालयातील नियम अटी माहित नसल्यामुळे त्याला अनेक वेळा चकरा माराव्या लागतात. यासंबंधी कोणीतरी पुढाकार घेऊन त्या शेतकऱ्याला कार्यालयातील कार्यपद्धती विषयी माहिती दिल्यास शेतकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण होऊ शकते. यासाठी जिल्ह्यातील जवळा येथील तलाठी शाम रणनवरे यांनी पुढाकार घेतला आहे.


रणवरे हे स्वतः शेतकऱ्यांशी भेटून त्यांच्या अडचणी एकूण घेतात तसेच तलाठी कार्यालयात कशाप्रकारे काम चालते, शेतकऱ्यांना जमीनचा सातबारा, उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी काय करावे लागते. याविषयी माहिती देतात. रणवरे यांच्या या कार्याची दखल घेत जिल्‍हा प्रशासनाच्‍या वतीने राबविण्‍यात येत असलेल्‍या 'बळीराजा चेतना अभियानाचा' शासकीय कर्मचारी गटातून प्रथम पुरस्‍कार रणवरे यांना जाहीर करण्‍यात आला. यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्‍या हस्‍ते १ मे महाराष्‍ट्र दिनी त्यांना हा पुरस्‍कार देऊन गौरविण्यात येणार आहे.


गेल्या वर्षी यवतमाळ जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांना प्रबोधन करण्यासाठी सुशिक्षित नागरिकांनी तसेच समाजसेवी संस्थांनी पुढे यावे असे आवाहन केले होते, या आवाहनाला प्रतिसाद देत ‘बळीराजा चेतना अभियान’ अंतर्गत शेतकऱ्‍यांना प्रबोधन करण्यासाठी अनेक संस्थांनी पुढाकार घेतला होता. या अभियानाच्या माध्यमातून शेतकरी आणि गावाच्या उत्कर्षासाठी अविरत प्रयत्न करत असलेले हे कार्यकर्ते, ग्रामस्‍तरीय समिती तसेच सामाजिक आणि सांस्‍कृतिक संस्‍थाचा देखील सन्मान येरावार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.


ग्रामीण भागातील शेतकऱ्‍यांशी नाळ जुळलेला तलाठी मुख्‍य घटक होय. शासनाच्‍या कल्‍याणकारी योजना राबविण्‍याची तेवढीच जबाबदारीही या तलाठ्यावर असते. जमिनीचा सातबार असो वा आठ अ, नकाशा, उत्‍पन्‍नाचा दाखला, नैसर्गिक आपत्तीचे सर्वे अशा विविध कामे करावी लागतात. यातच तलाठ्याने ठरविले की, आदर्श ग्राम बनवायचे याला गावकऱ्‍यांची साथ मिळाल्‍यास शासकीय योजना असो वा लोकसहभागातून होणाची कामे. सर्व अडचणी दूर करण्‍याचे काम ते करीत आहे.

Powered By Sangraha 9.0