अखेर वर्धा जिल्यातील कॅटरीना वाघिणीच्या पिल्लांचा सुगावा लागला

27 Apr 2017 21:29:57


वर्धा जिल्ह्यातील प्रसिद्ध बोर अभयारण्यातील कॅटरीना वाघिणीचे तीन छावे वर्धा वनविभागाने शोधून काढले आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी या अभयारण्यात कॅटरीना नावाच्या वाघिणीने छाव्यांना जन्म दिल्याची माहिती वर्धा वन विभागाला मिळाली होती. मात्र या वाघिणीने किती छाव्यांना जन्म दिला आणि ते कुठे आहेत याची नोंद वनविभागाकडून करण्यात आली नव्हती. त्यामुळे छाव्यांना शोधण्याची मोहीम वर्धा वनविभागाकडून करण्यात आली होती.




आता मात्र या मोहिमेत वर्धा वनविभागाला यश मिळाले असून कॅटरीना नावाच्या वाघिणीने तीन छाव्यांना जन्म दिल्याची माहिती वनविभागाला मिळाली आहे. रानटी जनावरांपासून छाव्यांचे संरक्षण व्हावे म्हणून वाघिणीने आपल्या पिल्लांना सुरक्षित स्थळी हलवले असल्याने या पिल्लांची नोंद वनविभागाला करता आली नव्हती.

मात्र आता वर्धा वनविभागाने या तिन्ही छाव्यांची नोंद केली असून त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे काम देखील वनविभागाकडून करण्यात आले आहे. सध्या विदर्भाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या वर असल्याने प्राणी ही उष्णता सहन करू शकत नसल्याने ते दिवसभर दाट झाडांमध्ये आसरा शोधतात, त्यामुळे वनविभागाला प्राण्यांना शोधणे कठीण होऊन बसते.

Powered By Sangraha 9.0