वैनगंगेत हॅलिकॉप्टर कोसळून दोघांचा मृत्यु

27 Apr 2017 20:57:03




गोंदिया जिल्ह्यातील बिरसी विमानतळाचे प्रशिक्षणार्थी हॅलिकॉप्टर वैनगंगेत कोसळल्याने दोघांचा मृत्यु झाला आहे. गोंदिया येथील बिरसी हॅलिकॉप्टर प्रशिक्षण केंद्रात हॅलिकॉप्टर उड्डाणाचे प्रशिक्षण देण्यात येत होते. त्यावेळी रायपुरच्या लावणी गावाजवळ हा अपघात झाला. या अपघातात विद्यार्थिनी महिला आणि प्रशिकाचा जागीच मृत्यु झाला.

विमानात तांत्रिक बिघाड झाल्याने हा अपघात घडला. विमान कोसळेलेले पाहताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हॅलिकॉप्टर जसेच धापेवाडा देवरी नदी जवळ आले अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने चालकाला ते सांभाळता आले नाही आणि हा अपघात झाला.



या अपघातात विद्यार्थिनी हिमानी (वय २०) और प्रशिक्षक वरिष्ठ पायलट रंजन गुप्ता (वय ३८) यांचा मृत्यु झाला आहे. या घटनेमुळे बिरसी विमानतळ प्रशिक्षण केंद्रातील विद्यार्थी आणि प्रशिक्षकांमध्ये तणावाचे वातावरण आहे.

Powered By Sangraha 9.0