रत्नागिरीत दोन पर्यटन महोत्सवांना सुरुवात

27 Apr 2017 22:11:33

रत्नागिरीत उद्यापासून चार दिवसांचे दोन पर्यटन महोत्सव एकाचवेळी सुरु होणार आहेत. रत्नागिरी नगर पालिका तसेच मांडवी परिसर पर्यटन विकास सेवा सहकारी संस्था आणि भैरव देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने या महोत्सवांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये पर्यटन फेरी, महिलांसाठी विशेष मुक्तांगण, लहान मुलांसाठी हॅपी स्ट्रीट, चित्रपट प्रेमींसाठी लघुपट महोत्सव, सागरी गुहेतील सफर, ट्रेक आवडणाऱ्या लोकांसाठी रॅपलिंग, व्हॅली क्रॉसिंग, जल क्रीडा, वाळू शिल्प, खाद्य महोत्सव, कोकणातील प्रसिद्ध असणाऱ्या पारंपारिक मासेमारीचे प्रात्यक्षिक आणि अशा अनेक विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले आहे.

महाराष्ट्रात रत्नागिरी पर्यटनासाठी उत्तम असा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेला समजला जातो. अशा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी पुढील चार दिवस भेट दिल्यास पर्यटकांना एक चांगली संधी मिळणार आहे. पुढील दोन दिवस रत्नागिरी जिल्ह्यात दोन पर्यटन महोत्सवांना सुरुवात होणार आहे. या महोत्सवाला पर्यटनप्रेमींनी जरूर भेट द्यावी.

या महोत्सवाचे थीम सॉंग ऐकण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...

 

Powered By Sangraha 9.0