भारतात पहिल्यांदाच रेल्वेत पाणी रहित शौचालयांची सुरुवात होणार

27 Apr 2017 22:24:39


भारतातील पाण्याच्या मोठ्या प्रश्नाला पाहता रेल्वे मंत्रालयातर्फे भारतातील रेल्वे गाड्यांमध्ये पाणी रहित शैचालय सुरु करण्याचा निर्धार केला आहे. भारताबाहेर अनेक दशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अशा शौचालयांचा वापर करण्यात येतो, मात्र भारतात हे पहिल्यांदाच होणार आहे.



यामध्ये पाण्याचा वापर करण्यात येणार नाही. टॉयलेट पेपर्स तसेच 'एअर सकिंग' प्रणालीचा वापर यामध्ये करण्यात येईल. भारतात उपस्थित पाण्यासारख्या मोठ्या प्रश्नावर उपाय म्हणून याकडे बघण्यात येत आहे. यामुळे स्वच्छतेचा प्रश्नही सुटेल.

तंत्रज्ञानाचा वापर करुन अशा पद्धतीने स्वच्छता आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठीचे हे महत्वाचे पाऊल असेल असे रेल्वे मंत्रालयातर्फे सांगण्यात येत आहे. यासंबंधी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्यातर्फे आवाहन करण्यात आले आहे.

Powered By Sangraha 9.0