भारतीय छात्र संसद विद्यार्थी परिषद निवडणुकीत जळगावचे वर्चस्व

26 Apr 2017 15:47:28





भारतीय छात्र संसदच्या ६ व्या विद्यार्थी परिषद निवडणुकीत जळगावच्या विद्यार्थ्यांनी वर्चस्व राखत यशस्वी कामगिरी बजावली हे या निवडणुकीत जळगावचे २५ विद्यार्थी वेगवेगळ्या जिल्ह्यात व राज्यातून समन्वयकपदी निवडून आले आहे.


विराज कावडीया नवी दिल्ली, तेजस श्रीश्रीमाळ महाराष्ट्र राज्य, मंजित जांगीड हरियाणा, अमित जगताप ठाणे, विनाद बावस्कर अहमदनगर, शुभम बियाणी मंुंबई, मितेश गुजर जळगाव, अक्षय जैन सातारा, पियुष तिवारी लातूर, पियुष नरेंद्र पाटील नांदेड, अर्पिता पाटील धुळे, भवानी अग्रवाल बुलढाणा, दुष्यंत यावलकर गोंदिया, पंकज सुराणा जालना, आकाश चोपडा नंदूरबार, विशाल जाधवानी रायगड, सुमित राय यवतमाळ, शुभम भंडारी, पुणे, सरिता माळी नागपुर, तबस्सुम शेख परभणी, नितेश चौधरी नाशिक, भूषण दंडगव्हाळ औरंगाबाद, पियुष हसवाल अहमदनगर याची समन्वयकपदी निवड करण्यात आली.


निवडणुकीत देशभरातील ३५, ००० विद्यार्थ्यांनी ई-मेलव्दारे मतदान केले. विद्यार्थ्यांच्या शपथविधीचा कार्यक्रम एम.आय.टी.स्कूल ऑफ गव्हर्नमेंट, पुणे येथे नुकताच झाला. भारतीय छात्र संसदचे मुख्य समन्वयक ग्रृप कॅप्टन डी.पी.आपटे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली.
डॉ.हेमा कुळकर्णी यांना पुढील वर्षात विद्यार्थ्यांना सामाजिक व राजकीय क्षेत्रात नवीन जोमाने काम करण्याचे आवाहन केले.
अध्यक्षस्थानी भारतीय छात्र संसदचे संयोजक राहूल विश्वनाथ कराड उपस्थित होते. दरम्यान १९ ते २१ जानेवारी २०१८ दरम्यान ८ व्या भारतीय छात्र संसदचे आयोजन पुणे येथे करण्यात येणार आहे.

Powered By Sangraha 9.0