आम्हाला गणित विषय नको !’

25 Apr 2017 08:59:56

रूईया महाविद्दयालयातील अकरावी बारावीच्या विद्दयार्थ्यांनी राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांची थेट मंत्रालयात भेट घेतली. विनोद तावडे यांनी देखील विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि जवळपास पंधरा ते वीस मिनिटे तावडे यांनी विद्दयार्थयांशी संवाद साधला.

अकरावी पास झालेल्या विद्यार्थांना बारावीमध्ये  गणित हा विषय नको आहे. गणित वगळून  (ड्रॉप) करून  मानसशास्त्र (सायकॉलॉजी) हा विषय घेण्याची इच्छा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आणि तशी सवलतही देऊ असे महाविद्दयालयाकडून सांगण्यात आले होते.

यासाठी 50 ते 60 विद्दयार्थी आहेत ज्यांना मानसशास्त्र हा विषय घेण्यास इच्छुक आहेत. मात्र यातील फक्त 30 विद्यार्थ्यांनाच ही मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे या सर्वच विद्यार्थ्.नाही विषय निवडीची मुभा देण्यात यावी या मागणीसाठी रूईया कॉलेजचे विद्यार्थी तावडे यांना भेटलेत. याबाबत रूईया कॉलेजशी आपण स्वत चर्चा करू असे आश्वासन विनोद तावडे यांनी या विद्यार्थ्यांना दिले.

Powered By Sangraha 9.0