प्रदूषणाच्या विळख्यातून अर्थपूर्ण सुटका

    दिनांक  28-Mar-2017   
 
 


वाहनांच्या अतिवापरामुळे होणारे हवेचे प्रदूषण, इंधनाची उपलब्धता, त्याची सतत वाढणारी किंमत, कधी धोक्यात आलेले इंधनाचे साठे यावर सातत्याने चर्चा होते, काही उत्पादनेही बाजारात येतात. पण यातील बहुतांश प्रयत्न फसल्याचे दिसते. मात्र, सरीन इंडस्ट्रीज यांनी आणलेल्या ‘KM +' या प्रॉडक्टमुळे इंधनाच्या वापरात मोठी बचत होत असून त्यामुळे ग्राहकांचा व देशाचाही पैसा वाचत आहे. एवढेच नव्हे तर हे प्रॉडक्ट १०० टक्के नैसर्गिक असल्याने यामुळे पर्यावरणाला कोणताही धोका नाही. अशा या सर्वात सुरक्षित आणि जगभरात नावाजलेल्या, वापरात असलेल्या जागतिक मानांकन प्राप्त प्रॉडक्टची सुरुवात भारतात नेमकी कशी झाली ते जाणून घेऊया.
 
भारतातील मुंबई, दिल्ली, पुणे, हैदराबाद, बंगळुरु, नागपूर ही महानगरे दिवसेंदिवस प्रदूषणाच्या विळख्यात अडकत चालली आहेत. दररोज लाखोंच्या संख्येने रस्त्यांवरुन ये-जा करणार्‍या राज्य परिवहन बसेस, खाजगी वाहने, चारचाकी, तसेच दुचाकी वाहनांसाठी मुख्य इंधन म्हणून पेट्रोल व डिझेलचा अनियंत्रित वापर केला जातो. याचा एकत्रित परिणामहानिकारक ठरत असून, आज ना उद्या आपल्या सर्वांना त्याची झळ पोहोचणारच आहे. तसेच या इंधनांची किंमत सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर जात आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन, ‘सरीन इंडस्ट्रीज’ या प्रसिद्ध उद्योगाने ‘KM+’ हे एक अद्ययावत जैविक इंधन मिश्रित (बायो फ्युएल ऍडीटीव्ह) उत्पादन बाजारात आणले आहे.
 
‘KM(RE­CH) +’ वापरल्यामुळे बाईक, कार, रेल्वे, कारखाने, बसेस, इत्यादींच्या पेट्रोल व डिझेल वापरामध्ये १० ते २० टक्क्यांची बचत होऊ शकते, असा दावा करण्यात आला आहे. याशिवाय लक्षात घेण्याची महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे उत्पादन बिनविषारी, पर्यावरणपूरक, जैवविघटनशील, ग्रीन, अज्वलनशील, १००% जैविक व जागतिक पातळीवर प्रमाणित असून ते रीच निकषांची पूर्तता करते. ‘KM+’ हे १०० टक्के नैसर्गिक वनस्पतिजन्य इस्टरपासून बनवले जाते. सरीन इंडस्ट्रीज हे ‘KM +’ व मलेशियाच्या ‘बायोसर्ज एशिया’ या प्रतिष्ठीत कंपनीतर्फे बनविल्या जाणार्‍या सर्व उत्पादनांचे अखिल भारतीय वितरक आहेत.
 

 
‘सरीन इंडस्ट्रीज’ने १९७१ मध्ये कामाची सुरुवात केली असून, कंपनीचे सध्याचे व्यवस्थापकीय भागीदार साजिद वारावाला यांचे वडील एम. सैफीभाई एम.एस. वारावाला या कुटुंबप्रमुखांनी कंपनीची स्थापना केली. त्या काळात, टूथब्रश, पेंटब्रश, ब्रशसंबंधी इतर वस्तू, तसेच टूथपेस्ट इत्यादींसाठी लागणारा कच्चा माल व यंत्रसामग्री परदेशातून भारतात आयात करावी लागत असे. तशा परिस्थितीत, आयातीला पर्याय म्हणून पेंटब्रशच्या तंतूंचे टिपिंग व फ्लॅगिंग यांचे स्थानिक उत्पादन स्वतःच सुरु करण्याची कल्पना त्यांच्या डोक्यात आली. सुरुवातीला इतर मोठ्या कंपन्यांच्या स्पर्धेमुळे त्यांना बाजारपेठेत कठीण परिस्थितीला तोंड द्यावे लागले, परंतु आपली इच्छाशक्ती, निर्धार, सातत्य व कष्ट यांच्या आधारावर एम. सैफीभाई यांनी ओरल केअर व ब्रश उद्योग क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले.

 
‘सरीन’चे औद्योगिक जाळे विस्तारण्याच्या उद्देशाने, मुख्यतः पर्यावरणपूरक क्षेत्रांमधील संधींचा शोध घेण्यात आला. २०१४ मध्ये देशात सत्तांतर होऊन नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले व त्यांनी ‘मेक इन इंडिया’, ‘स्टार्टअप इंडिया’ अशा कल्पनांवर भर देऊन लघु व मध्यमउद्योगक्षेत्रास चालना दिली. प्रदूषणाच्या समस्येवर आणि सरकारी तिजोरीवर ज्याचा सर्वाधिक भार पडतो अशा मूल्यवान कच्च्या तेलाच्या बचतीवर देशातील जनतेशी संवाद साधला. त्यांच्या विविध भाषणांतून व माध्यमांना दिलेल्या घोषणांमधून, इंधन आयातीसाठी भारताची परकीय गंगाजळी मोठ्या प्रमाणावर खर्च होत असल्याचे सत्य समोर आले. या परिस्थितीत आपल्या पंतप्रधानांचे ध्येय लक्षात घेऊन, दोन वर्षांपूर्वी ‘सरीन इंडस्ट्रीज’चे साजिद व त्यांचे पुत्र झुल्फीकार यांनी देशाच्या फायद्याचा एखादा उपाय शोधून काढण्याचे ठरवले. प्रदीर्घ संशोधनानंतर त्यांनी केएल-मलेशियाला भेट दिली. ‘बायोसर्ज एशिया’च्या विविध उत्पादनांबद्दल त्यांनी माहिती मिळवली. त्यांनी या उत्पादनाच्या वैशिष्ट्यांचा खोलात जाऊन अभ्यास केला, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय ग्राहकांच्या प्रतिक्रिया लक्षात घेतल्या, आणि शेवटी ‘KM+’ पुढे आणण्याचा निर्णय घेतला. ‘KM+’ ची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेतः
 
१) हे एक प्रकारचे ऍडीटीव्ह असून पेट्रोल आणि डिझेल वापरल्या जाणार्‍या कोणत्याही यंत्रणेत (वाहने, जनरेटर संच, इत्यादींमध्ये) वापरण्यासाठी ते संपूर्णतः सुरक्षित आहे. ‘KM+’ हे १००% जैविक आहे, म्हणजेच त्यामध्ये कोणतीही रसायने, द्रावके, अल्कोहोल अथवा स्पिरीट मिसळलेले नाही.
 
२) याच्या वापराने धुराचे प्रमाण ५०% ते ९०% कमी होऊन वायू प्रदूषणात घट होते.
 
३) प्रतिलीटर जास्त ऍव्हरेज मिळते. एक लीटर इंधनासाठी ०.०६% म्हणजेच ६० मिली इतके क्षुल्लक ऍडीटीव्ह पुरेसे असते, ज्यामुळे १० ते २०% इंधन बचत होऊ शकते.
 
४) कमी घर्षण व नुकसानीमुळे वाहनाच्या इंजिनचे आयुष्य वाढते. इंजिन स्वच्छ राहिल्याने देखभालीचा खर्च कमी होतो.
 
५) इंजिनची कार्यक्षमता वाढते, थरथर (व्हायब्रेशन), उष्णता, व आवाज कमी होतात.
 
६) सौरऊर्जा, पवनऊर्जा, यांसारख्या इतर अपारंपरिक प्रकल्पांप्रमाणे यामध्ये कोणतीही भांडवली गुंतवणूक करावी लागत नाही. ‘KM+’ मिसळताना कसलीही जास्तीची गुंतवणूक करावी लागत नाही. वाहनाच्या टाकीत फक्त ‘KM+’ ऍडीटीव्हची बाटली सूचनेनुसार (०.०६%) मिसळावी लागते.
 
७) ‘KMMSDS, SIRIM, RE­CH, SGS +’ उत्पादनाला आंतरराष्ट्रीय मानक संस्थांकडून आणि इतर प्रमाणपत्रे प्राप्त झाली आहेत. ते १००% सुरक्षित, आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य व म्हणूनच परवडणारे उत्पादन आहे.
 
८) फक्त ‘KM+’च्या वापराने वाहनाचे नुकसान झाले तर, कंपनीने विमा व दाव्यातून नुकसानभरपाईची सोय केली आहे. जागतिक बाजारपेठेत उत्पादनाचे वितरण सुरु झाल्यापासून असा एकही दावा करावा लागलेला नाही.
 
९) ‘KM +’ हे सहसा कोरडे असणार्‍या पिस्टनच्या वरील भागासाठी वंगण म्हणूनही कामकरते. तसेच इंजिनचे कोणतेही घटक बदलण्याची गरज नाही. हलवून विरघळवण्याची काही गरज नाही.
 
१०) ‘KM +’ हे डिझेल, बायो डिझेल, पेट्रोल, इथेनॉलमिश्रित पेट्रोलमधे व्यवस्थित कामकरते. ‘KM+’ मुळे या मिश्रणाची कार्यक्षमता वाढते. एवढेच नव्हे तर, ‘KM+’ मिसळल्याने या मिश्रित इंधनाची कामगिरी शुद्ध पेट्रोल इंजिनाच्या बरोबरीने अथवा त्यापेक्षाही जास्त चांगली होते.
 
सध्या हे उत्पादन मलेशियामध्ये वापरले जात आहे व चीन, व्हिएतनाम, कंबोडीया, इंडोनेशिया, नायजेरिया, पेरु, पाकिस्तान, नेपाळ, बांगलादेश, उझबेकीस्तान, ऑस्टे्रलिया व भारतात निर्यात केले जात आहे. भारतात या उत्पादनाचा वापर करण्यास परवानगी असली तरी, भारतीय प्रमाणीकरण संस्थांनी या उत्पादनाच्या आणखी वापरासाठी प्रोत्साहन दिले पाहिजे. आज संपूर्ण जग इंधन बचत व परकीय गंगाजळी बचतीसाठी प्रयत्न करीत आहे. प्रत्येक व्यक्ती यामध्ये आपला वाटा उचलू शकते, ज्याचा त्यांना स्वतःला, त्यांच्या शहराला व त्यांच्या देशाला फायदा होणार आहे. देशाला याची गरज आहे व हे उद्दिष्ट २०२० मध्ये साध्य करण्याच्या आपल्या पंतप्रधानांच्या स्वप्नाच्या दिशेने लगेच सुरुवात करता येईल. प्रदूषणाच्या धोक्यांच्या सतत वाढत्या समस्येशी लढण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खंबीरपणे हातभार लावला पाहिजे. ‘KM+’ हा एक उत्कृष्ट पर्याय उपलब्ध झाला आहे. यासाठी सरकारी पातळीवरदेखील प्रयत्न झाले पाहिजेत. ‘KM+’च्या मदतीने, पेट्रोल व डिझेलच्या जास्त वापराच्या समस्येतून, तसेच इंधनांमुळे होणार्‍या प्रदूषणातून आपल्या देशाची नक्कीच सुटका होऊ शकेल. इंधनांच्या वाढत्या किंमतींमुळे व घटत्या उपलब्धतेमुळे प्रत्येक व्यक्तीच्या खिशाला पडणारी भोके ‘KM+’ या जादुई उत्पादनाच्या वापरामुळे कमी होऊ शकतील.
 
-महेश पुराणिक