आकाशाशी जडले नाते- रंग दे बसंती

    दिनांक  22-Mar-2017   

सुमित घरात आला आणि एकदम उत्सहात म्हणाला, “आबा, एका प्रोजेक्टसाठी मला कंपनीतर्फे जपानला जायचे आहे!”

“अरे वाह! सुमित तू तर उगवत्या सूर्याच्या देशात जाणार! छान छान! किती दिवस जायचे आहे?”, आबांनी विचारले.

“मी पुढच्या आठवड्यात जाणार, आणि दोन महिन्यांनी परत येणार! आजी मला भरपूर खाऊ करून दे बरे घेऊन जायला!”, सुमित म्हणाला.

“आता सगळा दिवाळीचा फराळ करून देते तुझ्या बरोबर! पुढच्या आठवड्यात येशील तेंव्हा तयार ठेवते! तुझी आई पण देणार असेल काय काय!”, दुर्गाबाई म्हणाल्या.

“ते तू आणि ती ठरावा. आबा, तुम्ही इतक्या सूर्याच्या गोष्टी सांगितल्या पण त्यात एकही जपानची नव्हती.”

“तू परत आलास की आपण ब्रह्मदेश, जावा, सुमात्रा, चीन, जपान, रशिया सगळ फिरून येऊ! ठीक आहे?”, आबांनी विचारले.   

“हो चालेल! मागच्या वेळी आपण सूर्यभक्तांबद्दल बोलत होतो. ते पूर्ण करायचे राहिले होते.”, सुमितने आबांना आठवण करून दिली.

“कसे आहे सुमित, भारतात सर्वत्र सूर्योपासना होती. आणि ती अनेक अंगांनी बहरली होती. जप, तप, यज्ञ, याग, होम हवन, सूर्यनमस्कार, मंदिरे एकूण मानसिक, शारीरिक, सामाजिक आणि राष्ट्राच्या आरोग्यासाठी सूर्योपासना करत. वैदिक संकल्पना अशी आहे की अग्नी देव विविध रूपांनी नटतो. तो पृथ्वीवर अग्नी आहे, आसमंतात विद्युलता आहे, आकाशात सूर्य आहे, यज्ञात आहुती स्वीकारणारा अग्नी आहे तर मानवात जठराग्नी आहे.

“अग्नी आणि सूर्याचे समानत्व अनेक विधींमध्ये दिसते. जसे अग्निहोत्रात सूर्योदयाची आहुती सूर्याला दिली जाते तर सूर्यास्ताची आहुती अग्नीला.

“थंडी संपताना आपल्याकडे काही ठिकाणी सूर्याची पूजा केली जाते तर काही ठिकाणी अग्नीची. पंजाब मध्ये इराण मध्ये अग्नीची पूजा, अग्नी भोवती नाचून केली जाते.


“भारताप्रमाणे पर्शिया मध्ये देखील सूर्य आणि अग्नीची पूजा करत असत. पारसी मंदिरात, अग्यारी मध्ये, अखंड जळणारा अग्नी असतो. ग्रीस व रोम मध्येही अग्नी पूजा प्रचलित होती. रोमराज्यात Temple of Vesta नावाची अनेक अग्नी मंदिरे होती. उगवत्या सूर्याला वंदन करणारे हे अग्नी मंदिर पूर्वाभिमुख असे. चौथ्या शतकात ख्रिश्चन धर्माच्या उदयानंतर या मंदिरातील हजारो वर्ष चेतवलेला अग्नी विझवून पूजा बंद करण्यात आली. या मंदिरातील संगमरवर, खांब इत्यादी ऐवज चर्च बांधण्यासाठी वापरण्यात आले. Anyways, अग्नी पूजेचे अवशेष युरोप मध्ये अजूनही आहेत. जसे इंग्रजी शब्द - ‘ignite’ याचे मूळ ‘अग्नी’ या शब्दात आहे!


“तर हे सगळ सांगण्याचे कारण असे आहे -  भगवा ध्वज हे अग्नीचे प्रतिक आहे. पावित्र्य, तेज आणि वैराग्याचे प्रतिक आहे. असा अग्नीचा किंवा सूर्याचा भगवा ध्वज संपूर्ण भारतात पाहायला मिळतो. या ध्वजावर सूर्यभक्त रामचे धनुष्य खूप ठिकाणी दिसते. सूर्यभक्त हनुमान सुद्धा बऱ्याच ध्वजांवर दिसतो. छत्रपतींचा भगवा ध्वज सुद्धा सूर्याचेच प्रतिक होते!

“मला तर असे वाटते, फार पूर्वी पासून भारताने – असुर, ग्रीक, हुण, यवन, इसाई आक्रमणे परतवली ती केवळ सूर्योपासनेच्या शक्तीने.  

“स्वातंत्र्यपूर्व काळातील काही भारतीय राज्यांचे ध्वज पहा. भगवा – केशरी रंग आणि सूर्य किंवा हनुमानाचे चित्र असेलेले हे ध्वज प्रखर राष्ट्रभक्तीची चिन्हे आहेत -  

विजयनगर

 

पांड्य

 

चेरा

 

 

बडोदा, ग्वाल्हेर,

इंदोर, कोल्हापूर,

मिरज, सावंतवाडी

 

अजयगढ

 

 

बिकानेर

 

 

बुंदी

 

चंबा

 

 

दंत

 

 

देवास

 

 

धार

 

 

धुरवई

 

फरीदकोट

 

जमखंडी

 

 

जसदन

 

 

जत

 

जव्हार

 

झांसी

 

कांकेर

 

कूच बिहार

 

 

कुरुंदवाड

 

 

नरसिंहगढ

 

 

परताबगढ

 

 

रतलाम

 

 

 

References

Ben Cahoon http://www.worldstatesmen.org/India_princes_A-J.html

 

- दिपाली पाटवदकर