कर्ज प्रस्तावाची छाननी करताना..

28 Feb 2017 11:37:00


कोणताही कर्ज प्रस्ताव हाती येताच!

१. सर्वप्रथम पहा-

२. लक्षात असू दे – कर्ज वसूलीची प्रक्रिया कर्ज मंजूरीपूर्वी सुरू होते. म्हणूनच-

१. कर्जदार /सहकर्जदार /जामीनदार नीट तपसायला हवा. त्यांचे चारित्र्य(कॅरॅक्टर), क्षमता (कपॅसिटी) व भांडवल (कॅपिटल) या कडे साकल्याने लक्ष द्यायला हवे.

 २. त्याने सादर केलेला प्रकल्प अहवाल व्यवस्थित अभ्यासायला हवा.

 ३. कर्ज वेळच्या वेळी, कमीत-कमी हेलपाट्यात व नेमक्या गरजे इतके ( ना कमी, ना जास्त) द्यायला हवे. स्टेशनरी दुकानसाठीचे कर्ज ऑगस्टमधे देऊन काय उपयोग? ते शाळा सुरू होण्यापूर्वी एप्रील मधे मंजूर करायला हवे. आज जेवढे हेलपाटे ग्राहकास घालायला लावाल, त्याच्या दसपट हेलपाटे तो नंतर घालायला लावेल.

४. कर्जदाराने दिलेला अर्ज –

(त्यांची वये, पत्ते, व्यवसायाचा तपशील, व्यवसायाचे पत्ते,फोटो इत्यादी)

योग्य ते कागदोपात्री पुरावे सोबत जोडले आहेत ना?

उदाहरणार्थ-  पगार पत्रकाची प्रत, मागील तीन वर्षांची आयकर विवरणे, ताळेबंद व नफातोटा पत्रक, जमिनीचा ७/१२ चा उतारा वगैरे.

५. प्रत्यक्ष मुलाखत व जागेवर मंजूरी-पूर्व भेट

कर्जदाराचे चारित्र्य तपासण्यासाठी कोणतीही मोजपट्टी नसते. ‘चारित्र्य’ तर कर्ज प्रकरणातील सर्वात महत्त्वाची गोष्ट! कर्जदाराच्या संगतीत जेवढे रहाल तेवढे त्याच्या विविध सवयी, लकबी वगैरे संबंधातील वैयक्तिक अधिक तपशीलवार माहिती हाती येईल. या साठी पुरेसा वेळ देऊन घेतलेली त्याची दीर्घ मुलाखत, प्रत्यक्ष जागेवरील भेट जशी उपयुक्त, तशीच त्याच्या नातेवाईकांमधील, मित्र-मंडळीतील त्याची प्रतिमा तपासणेही गरजेचे! आम्हाला कर्जदार जसा प्रामाणिक हवा तसा निरलस (आळस नसणारा), निर्व्यसनी देखील हवा.

जो व्यवसाय तो अंगिकारणार आहे, त्याच्याशी संबंधित शैक्षणिक पात्रता, जरूर तो प्रत्यक्ष अनुभव त्याने पैदा केला आहे ना हे मुलाखतीतून स्पष्ट व्हावे. प्रत्यक्ष भेटीत त्याच्या अन्य क्षमता (उदा. त्याचे वय, शारिरीक आरोग्य,सांपत्तिक स्थिती) यांचाही नेमका अंदाज येतो.

मुलाखतीत तो सध्या करीत असलेल्या /करणार असणा-या व्यवसायासंबंधात नाना प्रश्न विचारून त्याला त्याच्या धंद्यातील सर्व खाचाखोचा ठाऊक आहेत ना याची चाचपणी करता येते. व्यवसायासाठी आवश्यक ते कौशल्य त्याच्या जवळ असलेच पाहिजे.

बँकरकडे नाना प्रकारचे कर्ज-प्रस्ताव येत असतात. आपल्याला त्यांच्या धंद्यातील काही कळणार नाही. पण कर्जदारास त्याच्या धंद्याची पुरेशी जाण आहे ना, हे ओळखण्याचे कसब बँकरजवळ निश्चित असते.

व्यवसायाकरीता आवश्यक ते भांडवल तो कसे उभे करणार आहे- स्वत:चे किती? उधार उसनवार किती ? ही माहिती मुलाखतीतूनच कळते.

तो सुरू करणार असणा-या व्यवसायासाठी काही शासकीय परवान्यांची आवश्यकता असल्यास त्या त्याने मिळवल्या आहेत ना हे पहायला हवे.

कर्जदार जर जुनाच ग्राहक असेल तर आपल्या जवळच्या पूर्वीच्या दप्तरातून तसेच जुन्या खात्याच्या अवलोकनातून खूपशी माहिती मिळू शकेल. जुन्या जाणत्या कर्मचा-यांशी केलेली सल्ला-मसलत बरेच काही सांगून जाईल!


या खेरीज अणखी काही महत्त्वाच्या गोष्टी -

ताळेबंदांचा/ नफातोटा पत्रकाचा सर्वांगीण अभ्यास गरजेचा! विशेषत: विविध गुणोत्तरे (रेशो) तपासायला हवीत. खेळत्या भांडवलाकरिता – तरलता (लिक्विडिटी रेशो), स्थिर भांडवलासाठी (मालमत्ता खरेदीसाठी) डी. एस्.सी.आर्. महत्त्वाचा!( डी.एस्. सी.आर्. या गुणोत्तरावरून कर्जदाराची मुदत-कर्ज परत करण्याची क्षमता समजते.)

नफ्याचे प्रमाण योग्य आहे ना हे पहाण्यासाठी नफ्याचे भांडवलाशी असणारे नाते तपासायला हवे. अशीच पहायची आहेत अणखीही इतर गुणोत्तरे!

या गुणोत्तर अभ्यसाला विशेष महत्त्व येते ते लिमिटेड कंपनीला कर्ज पुरवठा करताना!

हप्ता ठरवताना कर्जदाराकडे रक्कम कधी येते, हे विचारात घ्यावे लागेल; उदाहरणार्थ ब्रॉयलर पोल्ट्रीसाठीच्या कर्ज प्रकरणात दरमहाचा हप्ता देऊन चालणार नाही, तर दर चार महिन्याने हप्ता मागावा लागेल.

हा हप्ता देण्यात चूक झाल्यास खात्याचा प्रवास एन्.पी.ए.कडे सुरू झालाच म्हणून  समजा! अनेकदा कर्ज घेताना कर्जदार, बँक देईल तो हप्ता मान्य करतो; अन् भविष्यात मात्र टाळाटाळ करतो.

कर्ज मंजूरीचे टिप्पण (नोट)

एकदा कर्जमंजूरी /ना-मंजूरी निश्चित झाली की त्याचे सविस्तर, तपशीलवार टिप्पण करायला हवे. हे टिप्पण आपणास भविष्यात अत्यंत उपयोगी पडणार आहे. त्यात खालील बाबींचा खुलासा हवा.-

कर्ज-मंजूरीनंतर –

आता कर्ज वाटप! पण  तत्पूर्वी आवश्यक असतील दस्तऐवज!

कर्ज-वाटप –

कर्ज वितरणानंतर-

 

या व अशा ब-याच गोष्टी सांगता येतील. सतत सावधानता, कर्जदाराशी सतत संपर्क हेच महत्त्वाचे सूत्र!

 

- श्रीकांत धुंडिराज जोशी

Powered By Sangraha 9.0