बँकेत मुदत ठेव ठेवताना...

14 Feb 2017 11:32:00


सर्वसामान्यांच्या दृष्टीने बँकांतील मुदतठेव ही सर्वांत सोपी व लाभदायी ठरते. ठेव विमा महामंडळाने दिलेल्या रु. एक लाखापर्यंतच्या विम्याच्या हमीमुळे ती अधिक सुरक्षित ही होते. पण तरीही ठेव ठेवताना आवश्यक ती काळजी घेतली न गेल्यास पस्ताव्याची पाळी येऊ शकते. त्यासाठीच खालील मुद्दे-

अ-क, क-अ अशा विविध पद्धतीने ठेवी ठेवता येतील; व पूर्ण संरक्षण मिळवता येतील.


हप्ते वेळेवर भरण्यासाठी कायमस्वरुपाची सूचना बचत खात्यास देता येते; त्यामुळे लक्षात ठेवण्याची गरज उरत नाही. मात्र बचत खात्यास पुरेशी ठेव ठेवणे आवश्यक.

जर एखाद-दुसरा महिना हप्ता भरण्यात चूक झाली तर बँका दंड आकारतात. खरे तर हा दंड नसून जी रक्कम बँकेस वापरता आली नाही त्याची ती भरपाई असते. मुदत संपल्यानंतर मिळणाऱ्या रकमेत काहीच बदल होत नाही.

रिकरिंग खाते मुदतपूर्व बंद करायचे झाल्यास व्याज मिळते. ते मुदत ठेव पद्धतीने, ज्या काळासाठी ठेव बँकेकडे होती, त्या काळासाठी ठेव ठेवल्या तारखेस जो व्याज दर असेल त्यापेक्षा १% कमी मिळते.

रिकरिंग खाते तीन महिने पूर्ण होण्याच्या आत बंद केले तर बऱ्याच बँका काहीच व्याज देत नाहीत.

जर आवर्त खाती काही महिने हप्ते भरले, व पुढे भरलेच नाहीत, तरीही ते मुदत पूर्व / मुदत संपल्यावर बंद करता येते. काही वेळा अशा प्रसंगी बँकेतील कर्मचारी काही वेळा ‘व्याज मिळत नसते असे सांगतात’; जे साफ चुकीचे आहे.

पूर्वी ही रु. १०,००० ची व्याज मर्यादा प्रति शाखा मोजीत असात. २०१४-१५ पासून आता ती मर्यादा प्रत्येक बँकेप्रमाणे मोजली जाते.

त्याच प्रकारे ठेवीदार जर सहकारी बँकेचा सभासद असेल तर व्याजावर कर कपात होत नसे; ती ही सवलत आता काढून टाकण्यात आली आहे.

बँकांचे विविध नियम जाणून घेत, सावधानतेने व्यवहार केल्यास आपले हित जपले जाईल.

-श्रीकांत जोशी

Powered By Sangraha 9.0