चीनच्या एन्सर्कलमेंटला प्रत्युत्तर

    दिनांक  04-Dec-2017   मागच्या काही आठवड्यांत देशाची संरक्षण सिद्धता वाढवण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाच्या घटना घडल्या. त्याचे अवलोकन करणे जरूरी आहे. २४ ऑक्टोबर २०१७ रोजी भारतीय वायुसेनेने उत्तर प्रदेशातील उन्नावजवळच्या लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेवरील चार किलोमीटर भागावर २० लढाऊ विमानांचे उतरणे व उड्डाणाचा सराव केला. वायुसेनेचे विमानतळ शत्रूने हवाई हल्ल्यांद्वारे नष्ट केल्यास, तेथे तैनात वायुसैनिक आणि वैमानिकांनी अशा आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज असावे, या उद्देशाने हे प्रशिक्षण पार पडले. भारतीय वायुसेनेचे ५३ विमानतळ असून, त्यांनी ओडिशा, झारखंड व छत्तीसगडमधील तीन महामार्गासह यमुना व आग्रा एक्स्प्रेस वेसारखे बारा एक्स्प्रेस वेज अशा आपत्कालीन परिस्थितीमधील लँडिंग व टेक ऑफसाठी निश्चित केले आहेत. याशिवाय इतर आपत्कालीन परिस्थितीत विमानाच्या मदतीने सामानसुद्धा उतरवता येईल.

 

इस्रायलच्या इतिहासात प्रथमच सर्वात मोठा लष्करी सराव करण्यात आला. त्यात भारत व इस्रायलसह अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, ग्रीस व पोलंडने सहभाग घेतला. भारतीय वायुसेना पहिल्यांदाच सहभागी झाली. त्यासाठी सी-१३० जे सुपर हर्क्युलस एअरक्राफ्ट व ४५ सदस्यांचे पथक पाठवले. सामरिकदृष्ट्या हा अभ्यास फार महत्त्वाचा आहे.

 

दोन राष्ट्राध्यक्ष एकाच वेळेला भारत भेटीवर

गेल्या महिन्यामध्ये अमेरिकन सेक्रेटरी ऑफ स्टेट रेक्स डब्ल्यू. टिलरसन आणि अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष दोघेही एकाच वेळेला भारत भेटीवर आले. ही भेट जुळवून आणली होती.

 

या दोघांची एकाच वेळी होणारी भारतभेट एका पार्श्वभूमीवर घडून आली, ती म्हणजे, आताच अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अफगाणिस्तान आणि दक्षिण आशिया धोरण जाहीर केले. अमेरिका अफगाणिस्तानातील अश्रफ गनी यांच्या नेतृत्वाखालील लोकशाही पद्धतीने निवडून आलेल्या सरकारला पूर्ण पाठिंबा देणार आहे. गनी सरकारच्या विरोधात उठाव करणार्‍या तालिबान्यांना कोणत्याही प्रकारे समर्थन द्यायचे नाही, चर्चा करायची नाही अशी भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.

 

भारताचे महत्त्व वाढवले

अमेरिकेने अफगाणिस्तानातील २५ हजार अमेरिकन सैन्य काढून न घेता उलटपक्षी अतिरिक्त ५ हजार सैन्य पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. थोडक्यात, अमेरिकेचा अफगाणिस्तानातील रस वाढलेला आहे, यासाठी अमेरिका पाकिस्तानला डावलून भारताकडे अपेक्षेने पहात आहे. भारताने अफगाणिस्तानात संरक्षणविषयक भूमिका पार पाडावी. म्हणजेच, अफगाणिस्तानच्या राष्ट्रीय सैन्याला प्रशिक्षण देणे, शस्त्रास्त्रांचा पुरवठा करणे या गोष्टी भारताने कराव्या, अशी अफगाणिस्तानची अपेक्षा आहे.

 

पूर्वी अमेरिकेने अफगाणिस्तानात पाकिस्तानची भूमिका महत्त्वाची मानली होती. मात्र, ट्रम्प यांनी पाकिस्तानचे महत्त्व कमी करून भारताचे महत्त्व वाढवले आहे. ट्रम्प यांनी भारताने अफगाणिस्तानात विकासात्मक कामांबरोबर संरक्षणात्मक भूमिका बजवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

 

चीन समुद्रातील चीनच्या अरेरावीला पायबंद

फिलिपाइन्सची राजधानी मनिला येथे झालेल्या तीन दिवसीय आसियानआणि ईस्ट एशिया समिटया परिषदांच्या पार्श्वभूमीवर भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया या चार देशांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.

अधिकृतरीत्या आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात आंतरराष्ट्रीय कायद्यावर आधारित व्यवस्था कायम राखणे, शस्त्रास्त्र प्रसार रोखणे, दहशतवादाला आळा घालणे, मुक्त व्यापार व संपर्क वाढवून समृद्धी आणणे, अशी या चार देशांच्या चर्चेची उद्दिष्टे असल्याचे सांगितले गेले असले तरी या माध्यमातून चीनच्या वाढत्या प्रभावाला आवर घालण्यासाठी हे चार देश एकत्र येऊन रणनीती ठरवीत असल्याचे मानले जात आहे.

 

सहा महिन्यांत तिसरी भेट

आसियान शिखर परिषदेत भाग घेण्यासाठी फिलिपाइन्समध्ये गेलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात येथे गेल्या सहा महिन्यांत तिसरी भेट झाली. दोघांनी संरक्षण सहकार्य वाढवण्यावर भर दिला. तसेच भारत आणि अमेरिकेकडे जगातील सर्वात तुल्यबळ लष्करी सामर्थ्य असावे, असा संकल्पही केला. मोदींना मित्रआणि ग्रेट जंटलमनसंबोधत ट्रम्प म्हणाले की, ते उत्कृष्ट काम करत आहेत. उभय नेत्यांनी भारत आणि अमेरिकेत रणनीतिक सहकार्यावर सविस्तर चर्चा केली. तसेच मुक्त व खुल्या हिंद-प्रशांत क्षेत्राबाबत आपली कटिबद्धता व्यक्त केली.

 

उभय देशांत संरक्षण व रणनीतिक सहकार्य वाढवण्यावर भर

मोदी आणि ट्रम्प यांनी दिग्गज संरक्षण सहकार्‍यांच्या रूपात सहकार्य वाढवण्याचे सांगत संकल्प घेतला की, जगातील दोन महान लोकशाहीकडे जगातील सर्वात सामर्थ्यशाली लष्करही असावे. काही महिन्यांत भारताने अमेरिकेकडून १० दशलक्ष बॅरलपेक्षा जास्त तेल खरेदी केल्याची ट्रम्प यांनी स्तुती केली.

दोघांनी उभय देशांतील व्यापार वृद्धिंगत करणे, उत्तर कोरियाच्या संदर्भात अण्वस्त्र प्रसार व त्याचे स्रोत, पश्चिम आशिया व अफगाणिस्तानची स्थिती, रोहिंग्या व दहशतवादावरही चर्चा केली. चीन दौर्‍यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी मोदींचे कौतुक केले होते. ते म्हणाले होते, ज्या प्रकारे भारताने त्यांची अर्थव्यवस्था अत्यंत वेगाने पुढे नेली आहे, ते प्रशंसनीय आहे. ट्रम्प यांची मुलगी इव्हांका ट्रम्पही भारतात २८ ते ३० नोव्हेंबरदरम्यान होणार्‍या ग्लोबल एंटरप्रिन्योरशिप समिटमध्ये सहभागी झाली.

 

जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हब

पंतप्रधान मोदी यांनी आसियान व्यापार व गुंतवणूक संमेलनात परदेशी गुंतवणूकदारांना भारतात गुंतवणुकीचे आवाहन केले. ते म्हणाले की, जीएसटी आणि नोटबंदीसारख्या निर्णयाचे चांगले परिणाम झाले आहेत. अशा आर्थिक सुधारणा पुढेही कायम राहतील. मी भारताला जागतिक मॅन्युफॅक्चरिंग हबबनवू इच्छितो; जेणेकरून तरुण नोकरी मिळवणारे नाही तर नोकरी देणारे व्हावेत. आम्ही साडेतीन वर्षांत १२०० पेक्षा जास्त कालबाह्य कायदे संपुष्टात आणले. बँकिंगसह इतर क्षेत्रांत सुधारणेसाठी नवे कायदे केले. यामुळे व्यापार सुलभतेत भारत ३० अंकांची झेप घेऊन टॉप-१०० मध्ये पोहोचला आहे. अडएअछ चा ङ्गुल ङ्गॉर्म ईीेलळरींळेप ेष र्डेीींह एरीीं ईळरप छरींळेपी असा आहे. यात अमेरिका, रशिया, भारत, चीन, जपान आणि उत्तर कोरियासह एशिया रीजनल फोरम’ (एआरएफ)चे २३ सदस्य आहेत.

 

संरक्षणाचा मुद्दाच केंद्रस्थानी 

आसियानच्या १० सदस्य देशांच्या नेत्यांचा सहभाग असलेल्या दोन दिवसांच्या परिषदेत दहशतवादाबरोबर उत्तर कोरियाचा आण्विक कार्यक्रम आणि चीनचे विस्तारवादी धोरण यासारख्या महत्त्वाच्या आव्हानांचा परामर्श घेतला गेला. दक्षिण आशियाई देशांच्या संघटनेच्या सदस्य देशांच्या नेत्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे पंतप्रधान ली केगियांग, जपानचे पंतप्रधान शिंजो ऍबे, दक्षिण कोरियाचे अध्यक्ष मून जे इन आणि म्यानमारच्या नेत्या आंग स्यान स्यू की हे नेते उपस्थित होते.

 

भारतासाठी आसियानचे वाढते व्यापारी सहकार्य

चीनकडून दक्षिण चीन समुद्राच्या सर्वच भागावर आपला स्वायत्त हक्क सांगितला आहे. मात्र, आसियानमधील व्हिएतनाम, फिलीपाइन्स आणि ब्रुनेई या देशांनी या दाव्याला आक्षेप घेतला आहे. सागरी आणि हवाई वाहतुकीच्या स्वातंत्र्याच्या हक्कांवर भारताकडून भर दिला जात आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या देशांकडून याबाबत एकवाक्यतेची अपेक्षा आहे.

आसियानदेशांमधून भारतात गेल्या १७ वर्षांत ७० अब्ज डॉलरची गुंतवणूक झाली आहे. भारताच्या थेट परकीय गुंतवणुकीच्या १७ टक्क्यांपेक्षा ही अधिक आहे. गेल्या १७ वर्षांत आसियानमध्ये भारताची गुंतवणूक ४० अब्ज डॉलरपेक्षा अधिक झाली आहे. भारत आणि आसियानमध्ये व्यापारी संबंध वाढत आहेत. दोन्ही बाजूंकडून व्यापार आणि गुंतवणुकीसाठीचे सहकार्य वाढण्यावरच भर दिला जात आहे.

 

स्वत:च्या खर्‍या मित्रांची ङ्गळी उभी करावी लागेल

पूर्वेकडील देशांशी संबंध दृढ करण्यासाठी आता कृती करण्यावर सरकार लक्ष केंद्रित करीत आहे. जपान, व्हिएतनाम, इंडोनेशिया, मलेशिया, तैवान आदी देशांशी सहकार्य वाढविणे आर्थिक व व्यूहरचनेच्या दृष्टीनेही हिताचे आहे. भारताच्या पाहा पूर्वेकडेया धोरणाप्रमाणे आग्नेय आशियाई देशांशी संबंध सुदृढ करण्यासाठी भारत पुढाकार घेत आहे. पूर्वेकडच्या देशांशी संबंध वाढविताना चीनच्या आर्थिक, लष्करी वर्चस्वाला शह देणे हाच भारताचा दृष्टिकोन आहे. या दौर्‍याच्या मागचा सुप्त उद्देश या देशांना जवळ करण्याशिवाय, या देशांना मदतीला घेऊन चीनला अधिक सक्षमपणे तोंड देता यावे हाच आहे. भारतासाठी आता आसियान, पूर्व आशिया, जपान, कोरियाचे लष्करी आणि आर्थिक सामर्थ्य महत्त्वाचे ठरणार आहेत. चीनला उत्तर देण्यासाठी भारताला स्वत:च्या खर्‍या मित्रांची फळी उभी करावी लागेल.

 
- (नि. ब्रि.) हेमंत महाजन