परभणी जिल्ह्यात क्षयरुग्ण शोध मोहिमेस उद्यापासून शुभारंभ

    दिनांक  03-Dec-2017

परभणी : घरोघरी जाऊन नवीन क्षयरुग्ण शोधणे व जुन्या रुग्णांना आरोग्य विषयक सल्ला देण्याबाबतच्या क्षयरुग्ण शोध मोहिमेचे उदघाटन उद्या सकाळी ८ वाजता परभणी येथे महापौर श्रीमती मिनाताई वरपुडकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
 
 
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती श्रीमती श्रीमती उर्मिला बनसोडे, महापालिका आयुक्त राहुल रेखावार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.एम.शिंदे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.जावेद अथर हे राहणार आहेत तर महापालिका सभापती महेबुब खान, सदस्य रोडे, सदस्या श्रीमती अनिता सोनकांबळे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.
 
 
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाअंतर्गत क्षयरोग नियंत्रणासाठी केंद्र शासनाच्या निर्देशानूसार ३ टप्प्यांमध्ये प्रत्यक्ष क्षय रुग्ण शोध मोहीम राबविण्यात येत असून क्षयरोगाच्या जोखीमग्रस्त भागात जाऊन आरोग्य कर्मचारी, आशा व नर्सिंगच्या विद्यार्थ्यांमार्फत घरोघरी जाऊन नवीन क्षय रुग्ण शोधणे व जुन्या रुग्णांना आरोग्य विषयक सल्ला देण्याबाबतची मोहीम दि. ४ ते १८ डिसेंबर २०१७ या कालावधीत राबविण्यात येणार आहे. तरी २ आठवड्यापासून खोकला, ताप, भुक मंदावणे, वजनात घट आणि थुंकीतून रक्त येणे अशा संशयित रुग्णांनी या संधीचा लाभ घ्यावा. रुग्णांचे थुंकी नमूने, एक्स रे व औषधोपचार मोफत स्वरुपात उपलब्ध करुन देण्यात येत असल्यामुळे परिसरातील सर्व रुग्णांनी या मोहिमेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन परभणीचे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.वडकुते यांच्यातर्फे करण्यात आले आहे.