जव्हार परिसरात पुन्हा भूकंपाचा हादरा

    दिनांक  26-Dec-2017

मागील आठवड्यात बसले होते दोन हादरे

 

 
 
 
जव्हार : चार वर्षापूर्वी जमीनीखालून गूढ आवाज येत होते. तालुक्यात मागील आठवड्यात दोन वेळा भुकंपाचे हादरे बसले होते. आणि आज सकाळी पुन्हा भूकंपाचा हादरा बसल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
 
जव्हारमध्ये थंडीची लाट पसरली आहे. त्यामुळे पर्यटक येथे मोठ्या प्रमाणात आले असून सुट्टीचा आनंद लुटत आहेत. चार वर्षांपूर्वी जमिनी खालून गूढ आवाज येत होते. हे गूढ आवाज पावसाळ्यात सुरु असल्याने येथील नागरिकांमध्ये भीती पसरली होती. त्यानंतर आता पुन्हा भुकंपाचे धक्के सुरु झाले आहेत. आज सकाळी जव्हार आणि आजूबाजूच्या खेड्यांमध्ये धक्का बसला असून पत्रे जोरदार खडखड आवाज करत होते. मात्र, कोणत्राही प्रकारचे नुकसान न झाल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.
 
आज जव्हार शहर, आणि गरदवाडी, जुनी जव्हार, कासटवाडी, कालिधोंड अशा जवळपास दहा किलोमीटर अंतरापर्यंत घरांना जोरजोरात धक्के बसले आहेत. घरावरील पत्रे आणि जमीन काही सेकंद हदरात होती. त्यामुळे काही गावातील नागरिक मोकळ्या जागेत येऊन थांबले होते. चार वर्षापासून येत असलेले गूढ आवाज आणि बसणारे हे धक्के नेमके कशाचे आहेत याची चर्चा संपूर्ण तालुक्यात सुरु असून भीतीचे वातावरण पुन्हा एकदा पसरले आहे.
 
दरम्यान यावेळी आपत्कालिन विभागाशी संपर्क साधला असता कोणतेही उत्तर मिळाले नाही. त्यामुळे बसलेला धक्का किती रीश्टर स्केलचा होता तसेच उपाययोजनेबाबत माहिती मिळू शकली नाही.