भाजप आणि निवडणूक आयोगाचे साटे-लोटे - काँग्रेसची टीका

14 Dec 2017 17:31:11
 
 
भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र निवडणूक आयोगाने मिळून गुजरातमध्ये नवीन जुमला शोधून काढला आहे, असा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदान केल्यानंतर परतत असताना रोड शो केल्यामुळे काँग्रेसने हा आरोप केला आहे.
 
एका ट्वीटमध्ये त्यांनी लिहिले आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मतदाननंतर रोड शो तत्सम जो प्रकार केला, तो अतिशय निंदनीय आहे, निवडणूक आयोगाने यावर कारवाई केली पाहिजे. त्यात भाजपचे झेंडे फडकत असताना दिसत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. असे देखील त्यांनी नमूद केले आहे, घटनात्मक हनन झाल्यामुळे निवडणूक आयोगाने यावर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसचे गुजरात निवडणुकीचे प्रभारी अशोक गहलोत यांनी केली आहे.
 
६.५ कोटी गुजराती जनता निवडणूक आयोग आणि भाजपला धडा शिकवेल, घटनात्मक उल्लंघन म्हणजे काय असते, हे त्यावेळी लक्षात येईल, असे एका प्रसिद्धी पत्रकात काँग्रेसने म्हटले आहे. विकासाचा मुद्दा रोड शो, फोटो याद्वारे भटकण्यात येत आहे, असा आरोप केला आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0