एक २४ तर दुसरा ३६वर्षाचा; कोणी जिंकली असेल शर्यत?

13 Dec 2017 12:26:02

 
श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला. या सामन्यात महेंद्र सिंग धोनी सोडला तर दुसरा कोणताही फलंदाज श्रीलंकन माऱ्यासमोर टिकू शकला नाही. आज दुसरा एकदिवसीय सामना मोहाली येथे सुरु झाला असून सध्या तरी भारत सुस्थितीत असल्याचे दिसून येत आहे. परंतु हा सामना सुरु होण्यापूर्वी सरावादरम्यान धोनी आणि पांड्याचा एक व्हिडीओ 'बीसीसीआय'ने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे, तो व्हायरल होतोय.
 
धोनी व पांड्यामध्ये १०० मीटर धावण्याची रेस लागली आहे. एकाच वय आहे २४ तर दुसऱ्याचं आहे ३६. या रेस मध्ये कोण जिंकलं असेल हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्हाला खालील व्हिडिओ बघावा लागेल.
 
 

Powered By Sangraha 9.0