हुंडा न घेणे हीच बाबांना श्रद्धांजली : पंकजा मुंडे

    दिनांक  12-Dec-2017
 
भगवान गड : गोपीनाथ मुंडे यांनी कायमच राजकारण हे समाजकारणासाठी केले. त्यामुळे त्यांच्या जयंतीनिमित्त आपणही सामाजिक भान ठेवत स्वतःमध्ये बदल केला पाहिजे. त्यामुळे स्त्री भ्रूण हत्या किंवा हुंडा घेणे यांसारख्या कुप्रथा बंद करणे हीच गोपीनाथ मुंडे यांना खरी श्रद्धांजली ठरणार आहे असे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी केले. भगवानगड येथे दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित एका मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी यावेळी राज्याचे पशूसंवधर्न व दुग्धविकास मंत्री महादेव जानकर, आ. आर. टी. देशमुख, आ. लक्ष्मण पवार, आ. संगीता ठोंबरे, आ. भीमराव धोंडे, बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रवीण घुगे, जि. प. अध्यक्षा सविता गोल्हार आदी उपस्थित होते.
 
 
 
भगवान गड येथे गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त जाहीर आयोजित कार्यक्रम दिनांक ८ डिसेंबर रोजी घडलेल्या घटनेमुळे रद्द केले होते मात्र तरीही मोठ्या संख्येने लोक भगवान गडावर उपस्थित झाल्याने एका छोटेखानी समारंभात त्यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींना उपस्थितांनी उजाळा दिला. मुंडे यांनी आपल्याला राजकारणाचे प्राथमिक धडे दिले त्यामुळे समाजाच्या सुखदुःखांशी मला एकरुप होता आले असे पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या. तसेच स्वतःच्या पापांना झाकण्यासाठी दुसऱ्यांवर आरोप करण्याची वाईट सवयही मुंडे साहेबांमुळे आपल्याला लागली नाही असे सांगत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावरही निशाणा साधला.
 
पंकजा मुंडे यांचे या कार्यक्रमातील संपूर्ण भाषण -