लता दीदींना मिळणार अनोखी मानवंदना

07 Nov 2017 14:48:58


 

ठाणे भारतीय जनता पक्ष ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ’ अभियान व ’रिफाय’ यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय संयोजक डॉ राजेंद्र फडके यांच्या मार्गदर्शनाखाली भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित ‘हर मैजेस्टी’ ही मैफिल संपन्न होणार आहे. गानसम्राज्ञी लतादीदी यांच्या नुकत्याच पार पडलेल्या ८८व्या वाढदिवसाचे औचित्य साधत देशात वेगवेगळ्या ठिकाणी आणि परदेशात एका ठिकाणी अशा एकूण ८८ सांगीतिक कार्यक्रमांची मैफल आयोजीत केली जाणार आहे.

सांगीतिक कार्यक्रमांची सुरूवात ५ नोव्हेंबर रोज़ी ठाणे, पनवेल येथे मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. पुढ़ील दोन महिन्यांत देशातील अन्य भागात हे ८८ कार्यक्रमआयोजित केले जाणार आहेत. या मालिकेतील शेवटचा भव्य कार्यक्रमजानेवारीमध्ये मुंबईत होणार आहे त्या कार्यक्रमात सिनेमा, संगीत, राजकीय तसेच अन्य क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असतील. देशभरामधील ८८ ठिकाणी होणार्‍या कार्यक्रमांमध्ये प्रत्येक भागातील पाच कर्तृत्ववान महिलांना गौरवण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार अमित शाह, महाराष्ट्र भाजप प्रदेश अध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला, बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, ’बेटी बचाओ बेटी पढाओ’ अभियानाचे पालक खासदार डॉ.विनय सहस्त्रबुद्धे, राष्ट्रीय संयोजक डॉ.राजेंद्र फडके यांनी कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान, महाराष्ट्रात ४० ठिकाणी हा कार्यक्रमराबविण्यात येणार आहे.

Powered By Sangraha 9.0