महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेच्या सीसीसीपी कोर्सचा यशस्वी समारोप

03 Nov 2017 16:27:37

 


 

जिल्ह्यातून आंतरराष्ट्रीय बॉक्सर तयार होतील : बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक जयसिंग पाटी

शिरपूर : धुळे जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बॉक्सर आहेत, फक्त त्यांना शोधून प्रशिक्षण देण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बॉक्सिंग संघाचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग खेळाडू सुभेदार जयसिंग पाटील यांनी शिरपूर येथील स्व.विश्वासराव रंधे संकुलात झालेल्या कार्यक्रमात व्यक्त केले. सीसीसीपी प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना आणि जिल्ह्यातील बॉक्सिंग खेळाडूंना त्यांनी मार्गदर्शन केले.

 

सीसीसीपी प्रशिक्षण समारोप कार्यक्रमात विद्यार्थ्यांना प्रशिक्षक सुभेदार जयसिंग पाटी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी महाराष्ट्र बॉक्सिंग संघटनेचे सदस्य मिलन वैद्यधुळे जिल्हा बॉक्सिंग असोसिएशनचे खजिनदार जितेंद्र बोरसेप्रा.राधेश्याम पाटी उपस्थित होते.  प्रशिक्षक सुभेदार जयसिंग पाटी यांचा सत्कार जितेंद्र बोरसे यांनी तरमिलन वैद्य यांचा सत्कार राधेश्याम पाटी यांनी केला.

 

धुळे जिल्ह्यात लवकरच बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरु : मयूर बोरसे

धुळे जिल्हा क्रीडा संकुलात जिल्हा क्रीडाधिकारी संजय सबनीस यांच्या प्रयत्नाने लवकरच बॉक्सिंग प्रशिक्षण केंद्र सुरु होणार आहे. बॉक्सिंग खेळाला व्यासपीठ मिळून बॉक्सिंगचा प्रचार आणि प्रसार होईल व धुळे जिल्ह्यात राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार होतील. 

 

यावेळी कपिल शिंपीविजेंद्र जाधवधीरज पाटीअक्रम शेखदिपक ढोलेअमोल शिरसाठपूनम उठवाल, नेहा कासार, हेमांगी मराठे, गौरव परदेशीभुषण पवार, योगेश पाटी आणिनिलेश धनगर आदी उपस्थित होते.

Powered By Sangraha 9.0