संसदेचे हिवाळी अधिवेशन साधारणत: नोव्हेंबर महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होते, मात्र गुजरात आणि हिमाचल प्रदेशच्या निवडणुकांच्या कारणावरून ते डिसेंबर महिन्यात सुरु होणार आहे. यावरून विरोधी पक्षातर्फे केंद्र सरकारवर टीका केली जात आहे.
काँग्रेस पक्षाने एका कार्टूनद्वारे यावर चिमटा काढला आहे. या कार्टूनमध्ये संसद भवनला चादर पांघरलेली आहे. निवडणुका आहेत, त्यामुळे कुणीही 'डिस्टर्ब' करू नका अशी पाटी लावलेली दिसते. केंद्र सरकारच्या दृष्टीने संसदेच्या अधिवेशानापेक्षा निवडणुका जास्त महत्वाच्या आहेत, असे काँग्रेसला सांगायचे आहे.
त्यावर काँग्रेसने केलेल्या ट्वीटमध्ये गजरचे गमतीशीर उदाहरण देऊन लिहिले आहे की, जेव्हा हिवाळी अधिवेशनाची वेळ झाली तेव्हा, तुम्ही गजरला जसे थोड्यावेळासाठी बंद करतो, त्याप्रमाणे करू लागले आहात.
केंद्र सरकारने संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर पासून सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा केली, ५ जानेवारी २०१८ पर्यंत हे अधिवेशन असणार आहे. असे देखील सांगितले. संसदेच्या कामकाजाविषयी राजकारण करण्यात येवू नये अशी विरोधकांनी भूमिका घेतली होती. त्यावर प्रतिक्रिया देत निवडणुकीचा परिणाम संसदीय कामकाजावर होवू नये यासाठीच निवडणुकीनंतर संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरु करण्यात येत आहे." असे केंद्राने स्पष्ट केले होते.