संविधान दिनानिमित्त परभणी जिल्ह्यात जनजागृती

    दिनांक  23-Nov-2017

 

परभणी : डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वतीने महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यातून बार्टीचे महासंचालक व समतादूत प्रकल्प प्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली ६८ व्या भारतीय संविधान वर्धापन दिनाच्या निमित्ताने २१ नोव्हेंबर रोजी पासून संविधान जनजागरणाचा शुभारंभ करण्यात आला आहे.

 

परभणी जिल्ह्यातील तालुक्यातील कार्यरत समतादूत शाळा व महाविद्यालयातून संविधानावर वक्तृत्व, निबंध व संविधान उद्देशिका लेखन स्पर्धा घेऊन संविधान उद्देशपत्रिका वाटप करीत आहेत. परभणी जिल्हा स्थानिक पातळीवर नामांकित महाविद्यालयातून जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेसाठी महाविद्यालय निहाय तीन स्पर्धक निवडून त्यांची २४ नोव्हेंबर रोजी संविधान विषयावर सकाळी १० वाजता सहाय्यक आयुक्त कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जायकवाडी वसाहत, कारेगाव रोड, परभणी येथे जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहे. असे परभणी जिल्हा प्रकल्प अधिकारी दि.फ.लोंढे यांनी कळविले आहे.