शेतकऱ्यांना कापूस व तूर पिकांविषयी कृषी विभागाचा मार्गदर्शक सल्ला

    दिनांक  19-Nov-2017

 

परभणी : कापसाच्या पिकावर पडणाऱ्या प्रादुर्भावांविषी शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीविषयी परभणी जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले आहे. अशी कीड पडल्यास कोणती काळजी घ्यावी याविषयी तांत्रिक माहिती अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी बी.आर. शिंदे, उपविभागीय कृषी अधिकारी आर.टी. सुखदेव तसेच तंत्र अधिकारी डी.व्ही.नागुरे यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हे आवाहन केले आहे.

 

कापूस या पिकावर गुलाबी बोंडअळीचा प्रार्दुभाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी फेनप्रोपॅथ्रीन १० ईसी १० मिली प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी. कापूस या पिकावर लाल्याचा प्रार्दुभाव आढळल्यास त्याच्या नियंत्रणासाठी मॅग्नेशियम सल्फेट १ टक्के, तूर या पिकांमध्ये शेंगा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी इमामेक्टीन बेंझोएट ५ एसजी ४ ग्राम प्रति १० लिटर पाण्यात फवारणी करावी, एनएसकेई ५ टक्के (निंबोळी अर्क ५ टक्के) फवारणी करावी असे आवाहन या अधिकाऱ्यांनी केले आहे.