जिल्ह्यात 'दक्षता जनजागृती सप्ताहा'चे आयोजन

    दिनांक  01-Nov-2017


भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी जनजागृती


बुलडाणा : भ्रष्टाचार आळा घालून एक स्वच्छ आणि निर्दोष समाजव्यवस्थेची निर्मिती व्हावी, या उद्देशाने जिल्ह्यात ४ नोव्हेंबर २०१७ पर्यंत लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्यावतीने दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहा दरम्यान नागरिकांना भ्रष्टाचार, त्यामुळे निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यासंबंधीच्या विविध कायद्यांचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच आपला समाज हा भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नागरिकांनी प्रयत्न करावेत असे आवाहन देखील लाच लुचपत विभागाकडून करण्यात येणार आहे.


सप्ताहादरम्यान ३० ऑक्टोंबर रोजी बुलडाणा, धाड व चिखली येथे जनजागृती करण्यात आले आहे. विभागाच्या १०६४ या टोल फ्री क्रमांकाची माहिती देण्यात आली. तसेच ३१ ऑक्टोंबर रोजी मेहकर व लोणार येथे शासकीय कार्यालयात पत्रके वाटणे व लाच लुचपत बाबत जनजागृती करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे आज नांदुरा, खामगांव व शेगांव येथे, उद्या संग्रामपूर व जळगाव जामोद येथे, ३ नोव्हेंबर ला दे.राजा, सिंदखेड राजा व किनगांव राजा येथे आणि ४ नोव्हेंबर रोजी मोताळा व मलकापूर येथे जनजागृती करण्यात येणार आहे, असे लाच चुलपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधिक्षक यांनी कळविले आहे.