ग्रामपंचायत निवडणूक मतदानासाठी ७ ऑक्टोबरला स्थानिक सुट्टी

    दिनांक  06-Oct-2017

 

परभणी : राज्य निवडणूक आयोग मुंबई यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार नोव्हेंबर २०१७ ते ‍डिसेंबर २०१७ या कालावधीमध्ये मुदती संपणाऱ्या सार्वत्रिक ग्रामपंचायतीसाठी मतदान दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ रोजी शनिवारी होणार आहेत. दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ रोजी शनिवार हा दिवस कार्यालयीन कामकाजाचा दिवस असल्यामुळे राज्य निवडणुक आयोगाचे पत्रकान्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार परभणीचे जिल्हाधिकारी पी.शिवशंकर, यांनी जिल्हयातील नऊ तालुक्यातील १२६ ग्रामपंचायतच्या होणाऱ्या निवडणुकासाठी तेथील मतदारांना हक्क बजावता यावा या करिता मतदान होणाऱ्या क्षेत्रापुरती दिनांक ७ ऑक्टोबर २०१७ रोजी स्थानिक सुट्टी जाहीर केली आहे.

 

तसेच इतर सर्व आस्थापना व बँका ज्यांना जिल्हाधिकारी यांनी दिलेली स्थानिक सुट्टी लागू होत नाही, त्यांच्या आस्थापनेवरील अधिकारी / कर्मचारी यांना मतदान करता येणे शक्य व्हावे या करिता कामाच्या तासामधुन दोन तासाची सवलत देण्यात आहे असे जिल्हाधिकारी परभणी यांनी पत्रकान्वये सुचित केले आहे.