मराठवाड्यात अतिवृष्‍टीचा इशारा

    दिनांक  06-Oct-2017

नागरिकांना सतर्कतेचा इशारा ...

परभणी : मराठवाडा, विदर्भ, मध्‍य-महाराष्ट्रात भारतीय हवामान विभागाने ५ ते १४ ऑक्टोंबर दरम्यान अतिवृष्‍टीचा इशारा दिला आहे. जिल्‍ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्‍वास न ठेवता अतिवृष्टीत पुरापासून सतर्कता बाळगावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्‍हयातील नदीकाठच्‍या ठिकाणी या अतिवृष्‍टीचा धोका होऊ शकतो. याकाळात शेतकऱ्यांनी धान्‍ये सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. विजेचा कडकडाट होत असल्यास सुरक्षित ठिकाणी थांबावे. कोणत्याही परिस्थितीत उंच झाडाचा आसरा घेऊ नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

 

विद्यार्थी व नागरिकांनी नदी, ओढ्याकाठच्‍या धोकादायक स्वरुपात पाणी वाहणाऱ्या पुलावरुन किंवा पाण्यात जाण्याचे टाळावे. आणीबाणीच्या प्रसंगी सतर्क राहून याबाबत वेळोवेळी कुठल्‍याही प्रकारची गरज पडल्‍यास जिल्‍हा प्रशासनाच्‍या वरीष्‍ठ कार्यालयांना त्वरीत कळवावे.