जिल्ह्यात आजपासून सहकार परिषदेचे आयोजन

    दिनांक  31-Oct-2017बुलडाणा - जिल्ह्यातील सहकार क्षेत्राला बळ देण्यासाठी पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आज जिल्ह्यात एक दिवसीय 'सहकार परिषदे'चे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था कार्यालय व सहकार भारती बुलडाणा जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने ह परिषदेचे आयोजन करण्यात आले असून सहकार क्षेत्राचा अधिकाधिक विकास करणे तसेच त्याला सर्व व्यापी बनवण्यासाठी विविध विषयांवर या परिषदेत चर्चा करण्यात येणार आहे.


आज दुपारी २ वाजता सहकार विद्या मंदीर सांस्कृतिक सभागृह, चिखली रोड बुलडाणा येथे करण्यात येणार आहे. या परिषदेला प्रमुख मार्गदर्शक म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर, यवतमाळ येथील व्याख्याते डॉ. नितीन खर्चे, उपनिबंधक तथा बीडीसीसे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक खरात उपस्थित राहणार आहे. तसेच उद्घाटनीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनीधी, सहकार क्षेत्रातील मान्यवर, सहकार विभागातील अधिकारी उपस्थित राहणार आहे. तरी या सोहळ्याला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक कार्यालय व सहकार भारतीच्यावतीने करण्यात आले आहे