लातूर, उस्मानाबादला भूकंपाचे सौम्य धक्के

    दिनांक  31-Oct-2017

 


 

लातूर : आज दुपारी महाराष्ट्रातील भूकंप प्रवण भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. लातूरमधील औसा तालुक्यात तर उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा तालुक्यातल्या सास्तूर माकणी परिसरात आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. यामुळे नागरिकांमध्ये काही वेळ भीतीचे वातावरण होते. यावेळी प्रत्यक्षदर्शी प्रमोद पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे माहिती देताना सांगितले आहे की, “आज दुपारी १२.२३ वाजता औसा तालुक्यातील तुगी येथे भूकंपाचा आवाज आल्याने व जमीन हादरल्याने घरांमधून माणसे बाहेर आली.”

 

Embeded Object

 

भारतीय हवामान खात्याने दुपारी २ वाजण्याच्या सुमारास या वृत्तास दुजोरा दिला आहे. या माहितीनुसार ३.०१ रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा भूकंप होता. औसा या लातुरमधील तालुक्याच्या सुमारे १० किलोमीटर परिसरात या भूकंपाचे धक्के जाणवल्याचेही हवामान खात्याने कळविले आहे. या घटनेत कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झाली नसल्याचे आमच्या वाचकांनी कळविले आहे.