नागरिकांना ऑनलाईन मुद्रांक भरण्याचे आवाहन

    दिनांक  11-Oct-2017


मुद्रांक विक्रेत्यांचा संपामुळे प्रशासनाचे आवाहन 

बुलडाणा : राज्यातील सर्व मुद्रांक विक्रेते व दस्तलेखक यांनी आपल्या मागण्यांसाठी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ई-चलनद्वारे ऑनलाईन मुद्रांक भरण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. महाकोषाच्या संकेतस्थळावर हे चलन नागरिकांना स्वतः तयार करत येऊ शकते, त्यामुळे नागरिकांनी ई-चलनाचा वापर करावा, असे प्रशासनाने म्हटले आहे.


नागरिकांनी http://gras.mahakosh.gov.in या संकेतस्थळावरून ई-चलन तयार करावे, तसेच आपल्या कामानुसार मुद्रांक शुल्काची आवश्यक ती रक्कम ऑनलाईन अथवा प्रत्यक्ष बँकेत जावून भरावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यामुळे नागरिकांना कसल्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही.


राज्यभरातील मुद्रांक विक्रेत्यांनी आपल्या मागण्यासाठी ९ तारखेपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे नागरिकांची कामकाजासाठी गैरसोय होवू नये म्हणून शासनाने ई चलानद्वारे मुद्रांक शुल्क भरण्याची व्यवस्था केली आहे. विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावर विविध दस्तऐवजांचे मसुदे उपलब्ध असून या संकेतस्थळावरून ग्रास प्रणलीच्या संकेतस्थळावरसुद्धा जाता येते. तरी नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे देखील प्रशासने म्हटले आहे.