_H@@IGHT_600_W@@IDTH_800.jpg)
म्हण म्हणजे काय ... !!!
म्हण म्हणजे बोधकथा, दृष्टांतकथा, कहावत, नीतीकथा किंवा उपमा. म्हणी एखाद्या परिस्थितिचे किंवा प्रसंगाचे किंवा व्यक्ति विशेषाचे वर्णन सोप्या उपमा आणि दृष्टान्त देऊन करतात. एखादी व्यक्ती आणि दैनंदिन जीवनातील कुटुंब आणि समाज व्यवहारांवर टिप्पणी करताना, निसर्ग, प्राणी, पक्षी, कीटक, फळे, भाज्या, शेत, अवजारे, जमीन, पाणी, हवा, वस्तु आणि माणूस यांची गुण वैशिष्ठ्ये आणि त्यातील साधर्म्य किंवा विरोधाभास दाखवण्यासाठी म्हणींचा वापर केला जातो. प्रत्यक्ष शब्दार्थापेक्षा म्हणीचा भावार्थ आणि गूढार्थ समजून घेणे आवश्यक असते. शतकापूर्वीच्या समाजाच्या श्रद्धा, लोकभ्रम आणि गृहीतकांचा परिचय या म्हणीतून होतो.
खालील म्हणी
शेती उत्पादन विषयक आहेत
१) इळा आणि भोपळा.
मथितार्थ: विरुद्ध स्वभावाच्या दोन व्यक्तींची जोडी.
२) कांदा आणि मर्दाचा बांधा.
मथितार्थ: हल्ली प्रचलित असलेल्या सिक्स पॅक या संबोधनाचे काही शतकांपासून प्रचलित असलेले मराठी लोकभाषेतील वर्णन.
--००—
वाकप्रचार कशाला म्हणतात ... !!!
वाकप्रचार म्हणजे दंतकथा किंवा कल्पित गोष्ट.... !!
यात प्राणी–पक्षी–व्यक्ति किंवा वस्तु यांचा संदर्भ वापर न करता, मानवाच्या अनुभवलेल्या धारणा–भावना, एखाद्या परिस्थितीला उपमा म्हणून वापरल्या जातात. वाकप्रचार तुलना करण्यासाठी वापरले जातात. यात कुठलाही बोध किंवा उपदेश नसतो.
खालील वाकप्रचार :-
शेती उत्पादन विषयक आहेत
१) आंधळी नगरी चौपट राजा, टका शेर भाजी आणि टका शेर खाजा.
मथितार्थ: समाजात अराजक आणि गोंधळाची परिस्थिति.
२) भ्रमाचा भोपळा, चौपाई मोकळा.
मथितार्थ: भ्रमाला किंवा गृहीतकाला कुठलाही पाया नसतो.
-अरुण फडके