
अनन्या : ए अमित ये पटकन आपण सेल्फी काढू..
अमित : अनन्या वेळ काळ जागा काही तरी तर बघ. आपण कॉलेजतर्फे जॉब फेअर ला आलो आहोत. we are part of it. We have to behave mature and professional. आज इथे जर आपण चांगलं परफॉर्म केलं तर उद्या नोकरी मिळेल. Its so damn important for us. आणि तू सेल्फीचं काय घेऊन बसली आहेस?_H@@IGHT_0_W@@IDTH_600.jpg)
अनन्या : गॉड.. चिल चिल.. लगेच काय चिडतोस, फेअर संपल्यावर काढू.. एवढं काय त्यात.
अमित : अनन्या अगं अजून सुद्धा कळत नाहीये का तुला? आता वॉशरूमच्या बोर्ड समोर काय सेल्फी काढतेय? अगं काय हे तुझं सेल्फी वेड.
अनन्या : अमित अरे मी आज पहिल्यांदा प्रॉपर फॉर्मल घातलयं. आणि फेसबुक अपडेट पण बघ ना. I got 30 likes in half in hour.
अमित : अगं हो पण आपण इथे का आलोय. फेसबुक च्या नवीन डीपी साठी का जॉब साठी.
अनन्या : अमित अरे जॉब मिळालाय हे तर तू टाकणारच ना एफबी वर? मग त्यासाठी तरी सेल्फी असू देत की अरे..
अमित : तुला काय हवं ते कर पण मला कुणी विचारलं ही मुलगी तुमच्या सोबत आहे का? तर मी सरळ नाही म्हणून सांगेन बरं का.
अनन्या : हुह यू सेल्फीश
अमित : वाह.. सेल्फीचं वेड तुला आणि परत वर मीच “सेल्फी”श.

(जॉब फेअर संपल्यावर)
अनन्या : अमित अरे रिझल्ट्स उद्या कळणार आहेत. आणि आपल्या हातात आज भरपूर वेळ आहे. चल ना मरीन ड्राईव्ह ला जावूयात.
अमित : कूल. छान आयडिया आहे. चला.
(मरीन ड्राईव्ह वर)
अमित : अनन्या अगं बास सकाळ पासून ८० तरी सेल्फीज काढल्या असतील तू.
अनन्या : काहीही बरं का.. आणि आपण आत्ता मरीन ड्राईव्ह ला आहोत कम ऑन अमित. Its not job fair nor the college. इथे तरी मला टोकू नकोस ना अरे.
अमित : अनन्या सांभाळून. पाणी खोल आहे. फोटोच्या नादात काहीबाही करु नकोस. अनन्या ऐक अगं पुढे जावू नकोस.
अनन्या : लास्ट पिक प्लीझ.
अमित : अनन्या.... अगं ऐक.. मागे बघ.. अनन्या....
(सेल्फीच्या नादात दगडावरून पाय सटकून अनन्या थेट समुद्रात जाते.... कधीही परत न येण्यासाठी)
खरं बोलली अनन्या. तो तिचा last pic च होता.
सेल्फीच्या नादात तिने सगळचं गमावलं. तिचा जीवही................